कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल अडचणीत, 400 कोटींच्या हवाला प्रकरणात होणार चौकशी

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल अडचणीत, 400 कोटींच्या हवाला प्रकरणात होणार चौकशी

यापूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना INX मीडिया घोटाळाप्रकरणी ईडीने अटक केली होती

  • Share this:

नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : कॉंग्रेसचे (Congress) वरिष्ठ नेते अहमद पटेल (Ahmed Patel) यांना आयकर विभागाकडून (Income tax Department) समन्स जारी करण्यात आला आहे. पटेल यांना 400 कोटी रुपयांच्या हवाला ट्रान्सजॅक्शन प्रकरणात नोटीस जारी करण्यात आली असून हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आयकर विभागाच्या विविध कंपन्यांद्वारे कॉंग्रेस पार्टीला पाठविलेल्या 400 कोटी रुपयांहून अधिक हवाला ट्रान्सजॅक्शनचा तपास केला जात आहे. यापूर्वी आयकर विभागाने अहमद पटेल यांना 11 फेब्रुवारी रोजी समन्स जारी केलं होतं आणि 14 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. हे समन्स IT Act सेक्शन 131 अंतर्गत जारी करण्यात आलं आहे. मात्र अहमद पटेल 14 फेब्रुवारी रोजी प्रकृती बरी नसल्याने हजर राहून बाजू मांडू शकले नाही. त्यांनी सांगितले होते की श्वासाचा त्रास होत असल्याने ते फरीदाबादच्या मेट्रो रुग्णालयात दाखल झाले आहेत. यापूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांचे नाव एका घोटाळ्यात आले होते. INX मीडिया घोटाळाप्रकरणी चिदंबरम यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर काही दिवस ते तिहार तुरुंगात होते.

चिदंबरम यांचं नाव खटल्यात आलं कसं ?

2007 मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना बेकायदेशीर परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली, असा आरोप होता. 15 मे 2017 ला CBI ने FIPB मध्ये झालेल्या अनियमततेबद्दल तक्रारही दाखल केली होती. त्याच वेळी या खटल्यात पहिल्यांदा पी. चिदंबरम यांचं नाव आलं.

पी. चिदंबरम यांच्याविरोधात तपास सुरूच राहिला. वेळोवेळी छापेही घातले गेले पण ठोस पुरावा मिळत नव्हता. कायदे मंत्रालयाने 3 फेब्रुवारी 2018 ला चिदंबरम यांचा तपास करण्याचे आदेश दिले. ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाने कार्ती चिदंबरम यांच्या तपासाचे आदेश दिले. त्यांच्यावर छापे घातले आणि 54 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, FIPB कडून परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळवण्याबद्दल INX मीडिया चे संचालक इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतली. इंद्राणी मुखर्जीने हे वरिष्ठ नेता पी. चिदंबरम आहेत, असं CBI ला सांगितलं होतं.

First published: February 18, 2020, 2:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या