पिवळा पडतोय 'ताज',आता धुक्याचाही बसला वेढा !

धूळ आणि प्रदूषणाचा जाड थर ताजमहालावर जमा झाला आहे, जेणेकरुन ताज पिवळसारखा दिसेल.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2017 08:43 PM IST

पिवळा पडतोय 'ताज',आता धुक्याचाही बसला वेढा !

10 नोव्हेंबर : वाढत्या प्रदुषणामुळे दिल्ली काळवंडलेली गेली आहे. याचाच फटका आता उत्तरप्रदेशसह सहा शहरांना बसला आहे. त्यामुळे प्रेमाचं प्रतिक असणाऱ्या आग्य्राच्या ताजमहलाला ही धोका निर्माण झाला आहे.

दिल्लीत वाढलेल्या प्रदुषणानंतर आता उत्तर प्रदेशच्या 6 शहरांमध्येही प्रदुषणाची पातळी वाढतं चालली आहे.

आग्रा येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 9 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या 'डेली एयर क्वालिटी इंडेक्स (एयुआय)'नुसार तिथंल प्रदूषित वातावरण 449 आहे जे अतिशय धोकादायक आहे.

ताजमहालावर जमा झालेले कण ताजमहलाला खूप धोक्याचं आहे. एवढं असूनही या संबंधित जिल्हा प्रशासनाला कोणतीही जाणीव नाही आहे.

खरंतर गेली अनेक वर्ष ताजमहल पिवळा पडत चालला आहे. त्यातच आता या प्रदुषणाचाही ताजमहलाच्या सुंदरतेवर परिणाम होणार आहे.

Loading...

धूळ आणि प्रदूषणाचा जाड थर ताजमहालावर जमा झाला आहे, जेणेकरुन ताज पिवळसारखा दिसेल. लवकर पाऊस नाही झाला तर त्याचा मोठ्या प्रमाणात ताजवर परिणाम होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...