Home /News /national /

निर्भयानंतर हाथरसमधील तरुणीलाही देणार न्याय; सीमा कुशवाह यांचा सुप्रीम कोर्टात लढा

निर्भयानंतर हाथरसमधील तरुणीलाही देणार न्याय; सीमा कुशवाह यांचा सुप्रीम कोर्टात लढा

ही केस सर्वोच्च न्यायालयात लढण्याचा इशारा देण्यात आला आहे

    नवी दिल्‍ली, 3 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) मधील कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या झालेल्या तरुणीची केस दिल्लीतील निर्भयाची वकील सीमा समृद्धी कुशवाह (Seema Samriddhi Kushwaha) लढणार आहे.  सीमा कुशवाह यांनी न्यूज 18 सोबत बातचीत करताना हे सांगितले. दोन दिवसांपूर्वी त्या हाथरस येथे पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांने केस घेण्याची परवानगी दिली आहे. सध्या त्या या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाण्याची तयारी करीत आहेत. वकील सीमा समृद्धी कुशवाह यांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या भावासोबत फोनवर बातचीत झाल्यानंतर हाथरस कुटुंबाशी भेट घेण्यासाठी गेले. जेथे त्यांना भेट घेण्यापासून रोखण्यात आले होते. यानंतर पीडितेचा चुलत भाऊ त्यांना भेट घेण्यासाठी दिल्लीला गेला. जेथे केस दाखल करण्याबाबत सर्व महत्त्वपूर्ण बाबी शेवटच्या टप्प्यात आहे. याशिवाय कुटुंबाकडून वकील पत्रावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. हे ही वाचा-...आणि प्रियंका गांधी झाल्या आक्रमक, कार्यकर्त्यांना पोलिसांपासून वाचवलं VIDEO सीमा यांनी सांगितले की, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येईल. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून गठीत केलेल्या एसआयटीच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत हा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. जो पाहिल्यानंतर केस दाखल करण्यात येईल. जर एसआयटीच्या रिपोर्टमध्ये कमकरता असेल तर वा कोणाचा जबाब दाखल करण्याचा राहून गेला असेल किंवा काही बाबी बदलल्या गेल्या असतील तर त्याबाबतील अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येईल. आणि कोर्टाकडून निर्देश देण्यासाठी अपील करण्यात येईल. ज्यामध्ये कोर्ट संज्ञान घेण्यापूर्वी या प्रकरणाचा विभिन्न बाजूने पुन्हा तपास करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. पीडिताच्या गावातील दुसरा पक्षा कशाही प्रकारे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय या कुटुंबाला आणि मदत करणाऱ्यांना नुकसान पोहोचवू शकही केस तात.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nirbhaya gang rape case

    पुढील बातम्या