मराठी बातम्या /बातम्या /देश /UPSC क्लिअर होताच गर्लफ्रेंडने दाखवला इंगा; 5 वेळा परीक्षा दिलेला प्रियकर रस्त्यावर आला अन्

UPSC क्लिअर होताच गर्लफ्रेंडने दाखवला इंगा; 5 वेळा परीक्षा दिलेला प्रियकर रस्त्यावर आला अन्

उजवीकडून पहिला तरुण प्रियकर (फोटो सोशल मीडिया)

उजवीकडून पहिला तरुण प्रियकर (फोटो सोशल मीडिया)

सुमारे 10 वर्षांपूर्वी तो बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून दिल्लीत आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India

बिहार, 21 ऑक्टोबर : बिहारमधील एका छोट्याशा गावातून एक तरुण आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन दिल्लीत आला होता. येथे येऊन त्याने मुखर्जी नगरमध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र, पाच प्रयत्न करूनही त्याची निवड झाली नाही. मात्र, यादरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडने यूपीएससीची परीक्षा पास केली. मात्र, यानंतर प्रेयसीने जे केले, त्यामुळे तरुण निराश झाला.

एका यूट्यूब चॅनलशी बोलताना हरिंदर पांडे नावाच्या व्यक्तीने सांगितले की, सुमारे 10 वर्षांपूर्वी तो बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून दिल्लीत आला होता. येथे त्याने आयएएसची तयारी सुरू केली. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. हरिंदरने पाच वेळा यूपीएससी या देशातील सर्वात कठीण परिक्षेसाठी प्रयत्न केले. तो एकदा मुलाखती पर्यंतही पोहोचला. मात्र, तो यूपीएससी नाही पास झाला.

हेही वाचा - मोठी बातमी! UPSC ESE 2023 परीक्षेचा टाइम टेबल जारी; परीक्षेची तारीख आणि Exam Pattern एका क्लिकवर

दरम्यान, हरिंदरच्या आयुष्यात एक मुलगी आली. मैत्रीनंतर तो तिच्या प्रेमात पडतो. ही 2014 मधील गोष्ट आहे. ही मुलगीही यूपीएससीची तयारी करत होती. हरिंदर म्हणाले की, याच दरम्यान युपीएससीमध्ये या मुलीची निवड झाली. पण काही दिवसांनी तिने माझा नंबर ब्लॉक केला. त्याच्या गर्लफ्रेंडने केलेल्या या कृत्यानंतर हरिंदर खूप निराश झाले. दरम्यान, त्यांच्या गर्लफ्रेंडने त्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी अनेक टिप्सही दिल्या.

आपल्या एका व्हिडीओमध्ये हरिंदर पुढे म्हणाले की, दिल्लीत आल्यानंतर त्यांनी पुस्तके वाचून टाकली. खूप अभ्यास केला. पैशाची कमतरता असेल तर गार्डची नोकरीही केली. पण कदाचित सर्वकाही व्यवस्थित केले गेले नाही. ते म्हणाले की, यूपीएससी पास झाली नसले तरी अभ्यासादरम्यान जे आयुष्यभर उपयोगी पडेल असे त्यांना खूप काही शिकायला मिळाले.

First published:

Tags: Bihar, Boyfriend, Girlfriend, Upsc exam