जाहिरात
मराठी बातम्या / देश / आणखी एका बाबाची एंट्री! बागेश्वर धाम बाबा नंतर आता संतजी यांची चर्चा, पाहा ते नेमकं काय करतात?

आणखी एका बाबाची एंट्री! बागेश्वर धाम बाबा नंतर आता संतजी यांची चर्चा, पाहा ते नेमकं काय करतात?

संतजी

संतजी

येथून कोणीही निराश होऊन परत जात नाही, असा लोकांचा विश्वास आहे.

  • -MIN READ Local18 Madhya Pradesh
  • Last Updated :

रवि कुशवाहा, प्रतिनिधी विदिशा, 4 जुलै : बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या दरबारमध्ये लाखों भाविकांची गर्दी असते. ते कोणतीही न पाहता पर्चा (चिठ्ठी) बनवतात. ते आणि ज्याला बोलावतात, ती चिठ्ठी त्याचीच निघते. दरम्यान, आता मध्य प्रदेशातील विदिशामध्ये एक बाबा चिठ्ठीद्वारे नव्हे तर तर लोकांच्या डोळ्यात काजळ लावून लोकांच्या समस्या सांगतात आणि दूर करतात. मध्य प्रदेशातील विदिशापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेहगावमध्ये हे संतजी आहेत. ते गेल्या 15 वर्षांपासून याच पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवत आहेत. ते कोणतीही चिठ्ठी काढत नाहीत. पण ते फक्त समस्या असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात काजळ लावतात आणि समस्या दूर होते. काजळ लावल्यानंतर ती व्यक्ती स्वतःच सर्व काही सांगते, असा दावा हे बाबा करतात.

News18लोकमत
News18लोकमत

गोपाल सिंग बघेल (संतजी) असे त्यांचे नाव आहे. अनेक वर्षांपासून इथे दरबारमध्ये येत असलेल्या प्रेम पटेल यांनी सांगितले की, संतजी मागील 15 वर्षांपासून हे काजळ लावत आहेत. जो त्यांच्याकडे येतो, त्याला ते काजळ लावतात आणि काजळ लावताच ती व्यक्ती आपोआपच खरे बोलू लागते. येथून कोणीही निराश होऊन परत जात नाही, असा लोकांचा विश्वास आहे. इतकंच नव्हे तर एकाद्याकडे जर चोरी झाली असेल किंवा त्याची कोणतीही समस्या असेल तर संतजी त्याला काजळ लावतात. यानंतर त्या व्यक्तीला सर्व काही दिसू लागते आणि त्याचा सामान कोणी चोरी केला आहे किंवा तो कुठे आहे हे सर्व त्याला दिसू लागते, असा लोकांचा विश्वास आहे.

मध्य प्रदेशातील गिरवार येथून आलेला सुमित म्हणाला, ‘मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की, संतजींनी काजळ लावताच, कोणतीही समस्या असो ती व्यक्ती स्वत:च बोलू लागते. दरबारमध्ये आलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही निराश होऊन येथून जात नाही. कोणतीही समस्या असो, संतजी ती सोडवतात. संतजींवर बालाजीचा आशीर्वाद आहे. समस्या कोणतीही असो, ते प्रत्येक समस्येचे निराकरण करतात, असे येथे आलेल्या भाविकांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात