जाहिरात
मराठी बातम्या / देश / Pulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला LeTच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Pulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला LeTच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Pulwama Encounter: सुरक्षा दलांनी केला LeTच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

सोमवारी याच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून पळ काढला होता. 24 तासांमध्येच सुरक्षा दलांनी त्या तिघांनाही शोधून त्याचा खात्मा केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर 20 ऑक्टोबर: दक्षिण काश्मीरच्या पुलमावा जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यात आत्तापर्यंत 3 दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. पुलवामाच्या हकरीपोरा या भागात ही चकमक उडाली होती. लष्कर ए तौयबाचे 3 दहशतवादी या भागात लपून बसले होते. याची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याच वेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मंगळवार सकाळपासून अनेक तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना ठार केलं. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. त्यात 3 एक-47 रायफल्सचा समावेश आहे. सोमवारी याच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला करून पळ काढला होता. त्याच्या विरोधात मोठी मोहिम उघडली होती. त्याला दिवसभरातच यश मिळालं. गेल्या दोन दिवसांमधली ही तिसरी चकमक असून त्यात आत्तापर्यंत 4 दहशतवादी ठार झाले आहेत. सकाळीच पोलिसांना या दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस, CRPF आणि SOG यांचं खास पथक बनवलं होतं. त्यांचं सर्च ऑपरेशन सुरू होताच दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. पोलिसांनी त्यांना शरण येण्याचं आवाहन केलं मात्र त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर मोठी कारवाई करत सुरक्षा दलांनी त्या तिनही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलं.

जाहिरात

काही दिवसांपूर्वीच काश्मिरमधील बडदावमध्ये भारतीय सैन्याने लश्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याची समजूत काढून त्याला आत्मसमर्पण करायला भाग पाडलं होतं. त्यानंतर दहशतवाद्याच्या वडिलांनी सैन्याचे आभार मानले. यावेळी दहशतवाद्याने त्याच्या वडिलांसमोर भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. बडगाव जिल्ह्यातील छदूडा भागात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. मात्र ऑपरेशनदरम्यान सैन्याने लश्कर-ए-तैय्यबाच्या जहांगीर अहमद नावाच्या दहशतवाद्याची समजूत काढली व त्याला आत्मसमर्पण करायवयास सांगितले. कोणत्याही ऑपरेशनपूर्वी सैन्याचे जवान स्थानिक दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सांगतात. संघर्षादरम्यान दहशतवादी जहांगीरच्या आत्मसमर्पणाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये सैन्याचे जवान म्हणतात की, कोणीही फायर करणार नाही. त्यानंतर त्या दहशतवाद्याला सैन्याने पाणीही दिल्याचं व्हिडीत स्पष्ट झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात