चेन्नई, 11 जुलै : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel) किंमती गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट अक्षरशः कोलमडून पडलं आहे. अशा परिस्थितीत प्रवास करायचा तरी कसा, या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणसं करत आहेत. काहींनी सार्वजनिक वाहतुकीचा (Public Transport) पर्याय निवडला आहे, तर काहींनी प्रवासाचं प्रमाणच कमी केलं आहे. अशा परिस्थितीत दैनंदिन प्रवास करण्याचा एक स्वस्त, सोपा आणि पर्यावरणपूरक पर्याय तमिळनाडूतील (Tamilnadu) एका तरुणानं शोधून काढला आहे. हा आहे पर्याय आहे इलेक्ट्रिक सायकलचा (Electric cycle). तमिळनाडूच्या मदुराई कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धनुष कुमार (Dhanush Kumar) या विद्यार्थ्यानं स्वतः एक इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. ही सायकल पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीपासून दिलासा तर देईलच शिवाय प्रदुषण न झाल्यामुळे पर्यावरणाची होणारी हानीदेखील टाळता येईल, असं धनुषनं म्हटलं आहे.
Tamil Nadu | Madurai college student, Dhanush Kumar designs solar-powered electric cycle
— ANI (@ANI) July 10, 2021
The bicycle can run for up to 50 km continuously with the help of solar panels. A rider can travel more than a 20kms after the electric charges reduce to the downline pic.twitter.com/fNynBFC3z8
सायकलची खासियत या सायकलची बॅटरी एकदा चार्ज केली, की सायकल सलग 50 किलोमीटर अंतर पार करू शकते. त्यानंतर या बॅटरीचं चार्जिंग कमी होतं. अशा परिस्थितीत आणखी 20 किलोमीटर ही सायकल चालवता येते. अर्थात, त्याचा वेग थोडासा कमी होतो, मात्र त्यामुळे सायकलस्वाराला चार्जिंग संपूनही 20 किलोमीटर अंतर पार करण्याची मुभा मिळते. पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमध्ये ज्याप्रकारे रिझर्व्हचा पर्याय असतो, ज्यामुळे टाकीतील पेट्रोल संपत आले असल्याची सूचना मिळते, तशीच रचना या बॅटरीची करण्यात आली आहे. सायकल चालवण्याच्या नादात एखाद्याचं बॅटरीकडं लक्ष नसेल, तरी चार्जिंग संपल्यानंतर त्याला इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अधिकचं 20 किलोमीटर अंतर कमी वेगाने पार करता येतं. हे वाचा - मोठी बातमी: ‘अल कायदा’ चे दोन संशयित दहशतवादी अटकेत, बॉम्बसह शस्त्रास्त्रं जप्त आर्थिक बचत ही सायकल वापरली, तर दर 50 किलोमीटर प्रवासासाठी केवळ दीड रुपया खर्च येत असल्याचा दावा धनुष कुमारनं केला आहे. 12 व्होल्टच्या 4 बॅटरी यात बसवण्यात आल्या असून 30 ते 40 किलोमीटर वेगाने ही सायकल चालू शकते. यात 350 वॅटची एक ब्रश मोटारही बसवण्यात आली असून त्याला जोडून एक ऍक्सिलरेटर देण्यात आला आहे. याच्या मदतीनं सायकलचा वेग वाढवता येतो. सध्या मदुराई आणि आजूबाजूच्या परिसरात या सायकलचं आणि ती तयार करणाऱ्या धनुषचं जोरदार स्वागत होत आहे.