जाहिरात
मराठी बातम्या / देश / BSF च्या पुढाकाराने सीमेपार भावा-बहिणीची अखेरची भेट; उपस्थितांचेही पाणावले डोळे

BSF च्या पुढाकाराने सीमेपार भावा-बहिणीची अखेरची भेट; उपस्थितांचेही पाणावले डोळे

भावा-बहिणीची अखेरची भेट

भावा-बहिणीची अखेरची भेट

सीमेपार असलेल्या भावा बहिणीची बीएसएफच्या पुढाकाराने अखेरची भेट.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नॉर्थ, 24 परगणा : दुसऱ्या देशात राहणाऱ्या बहिणीची भावासोबत अखेरची भेट घडवून आणण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने घेतलेला पुढाकार ही एखाद्या चित्रपटातली कहाणी वाटेल; मात्र ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा दलांनी पुढाकार घेऊन हे शक्य करून दाखवलं. त्यामुळे बांगलादेशात राहणारी बहीण तिच्या भावाचं अंत्यदर्शन घेऊ शकली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    बांगलादेशमध्ये राहणाऱ्या साबर खान यांच्या बहिणीला भावाचं अंत्यदर्शन घेण्याची इच्छा होती. दक्षिण बंगाल भागातल्या हरिहरपूर या सीमावर्ती गावातल्या अमिरुद्दीन दफादार या गावकऱ्याने 23 एप्रिलला ही गोष्ट 68 बटालियनच्या मधुरपूर पोस्टवरच्या कंपनी कमांडरना सांगितली. साबर खान यांच्या अंत्यदर्शनासाठी बांगलादेशातल्या त्यांच्या बहिणीला येण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी केली. त्यावर सीमा सुरक्षा दलातल्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशमधल्या सीमा सुरक्षा दलाशी (BGB) संपर्क साधला व भावा-बहिणीची अखेरची भेट घडवून आणण्याचा दोन्ही दलांनी निश्चय केला. या प्रकरणाकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहून सीमा सुरक्षा दलाने हा निर्णय घेतला. सीमाभागाची सुरक्षा लक्षात घेता, दोन्हीकडच्या सुरक्षा नियमांच्या अंतर्गतच बहिणीला भावाचं अंत्यदर्शन घेण्याची परवानगी देण्याचं ठरवण्यात आलं. त्यानंतर लगेचच भावाचा मृतदेह आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आणण्यात आला. दुसऱ्या बाजूला राहणारी बहीण व काही नातेवाईकांसाठी विशेष व्यवस्था तयार करण्यात आली. बॉर्डर गार्ड फोर्स आणि बीएसएफ यांचं या गोष्टीसाठी विशेष कौतुक होतंय. वाचा - रिफायनरीला काँग्रेसचा विरोध नाही पण…; नाना पटोलेंची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका बीएसएफच्या प्रवक्त्यांच्या मते, “आम्ही रात्रंदिवस सीमेवर तैनात असतो. देशाच्या सुरक्षेसोबत आम्ही सीमावासीयांच्या धार्मिक आणि सामाजिक मूल्यांनाही महत्त्व देतो. ज्या घटनांमध्ये सहानुभूतीने निर्णय घेण्याची गरज असते, तिथे बीएसएफ नेहमीच मदतीचा हात पुढे करतं.” सीमा सुरक्षा दल सीमाबाहेरच्या दहशतवादी शक्तींच्या विरोधात असते; मात्र जेव्हा मानवतेचा आणि मूल्यांचा प्रश्न येतो, तेव्हा ते नेहमीच सामान्य माणसांच्या बाजूने असतात. सीमा दलाच्या या कृतीचं सीमाभागातल्या सर्व नागरिकांनी कौतुक केलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: BSF
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात