Home /News /national /

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 1 पोलीस शहीद; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 1 पोलीस शहीद; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist attack) एक पोलीस अधिकारी शहीद झाले असून दहशतवादी पळून गेले (Terrorist ran away) आहेत.

    श्रीनगर, 12 सप्टेंबर : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist attack) एक पोलीस अधिकारी (Police officer) शहीद झाले असून दहशतवादी पळून गेले (Terrorist ran away) आहेत. पळालेल्या दहशतवाद्यांचा पोलीस माग काढत असून जखमी पोलीस अधिकाऱ्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या खानयार परिसरात ही घटना घडली. असा झाला गोळीबार श्रीनगरमधील खानयार परिसरात असणाऱ्या पोलीस स्थानकावर काही दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. काही कळायच्या आतच अचानक गोळीबार झाल्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला गोळ्या लागल्या. हा अधिकारी खाली कोसळताच इतर पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेत त्याला सुरक्षित स्थळी हलवले. इतर पोलिसांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र भ्याड हल्ला करून दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या दहशतवाद्यांच्या शोधासाठी पथकं पाठवली असून लवकरच त्यांना टिपलं जाईल, अशी माहिती मिळत आहे. रविवारी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी दहशतवाद्यांनी खानयार परिसरातील पोलीस स्टेशनला लक्ष केलं. अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. या गोळीबार पोलीस उपनिरीक्षक अर्शद अहमद गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एसएमएमएच रुग्णालयात उपचार सुरू करण्यात होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हे वाचा - कोरोनाचा पुन्हा उद्रेक! पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक पुन्हा वाढल्या कारवाया दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेक्यांनी डोकं वर काढल्याचं चित्र गेल्या काही दिवसांत दिसू लागलं आहे. शुक्रवार दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या चानापोरा परिसरात सीआरपीएएफच्या पथकावर बॉम्बहल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान आणि दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून ड्रोनचा वापर करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात होता. आता पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचं या घटनांवरून दिसत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Srinagar, Terror attack

    पुढील बातम्या