• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • हॉस्पिटलच्या  ICUमध्ये लागली आग, 9 रुग्णांना खिडकी तोडून काढलं बाहेर; पाहा VIDEO

हॉस्पिटलच्या  ICUमध्ये लागली आग, 9 रुग्णांना खिडकी तोडून काढलं बाहेर; पाहा VIDEO

लोकांनी खिडकी तोडून रुग्णांना तातडीने बाहेर काढलं. यावेळी रुग्णांचे प्रचंड हाल झाले.

 • Share this:
  जामनगर 25 ऑगस्ट: कोविडच्या प्रकोपामुळे सगळे हॉस्पिटल्स हाऊसफुल्ल आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. या परिस्थित मंगळवारी गुजरातमधल्या जामनगरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ICU आग लागली. आग लागल्याने प्रचंड गोंधळ झाला. शेवटी लोकांनी खिडकी तोडून 9 रुग्णांना बाहेर काढलं. त्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचले. या रुग्णांना आता दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आयसीयूमध्ये सगळं बंदिस्त असल्याने आग लागल्यानंतर लगेच धूर जमा झाला. नेमकं काय झालं हे कुणालाच कळलं नाही. नंतर एकच धावपळ झाली. शेवटी हॉस्पिटलच्या लोकांच्या मदतीला रुग्णांचे नातेवाईक आणि आजुबाजूचे लोक धावून आलेत. लोकांनी खिडकी तोडून रुग्णांना तातडीने बाहेर काढलं. यावेळी रुग्णांचे प्रचंड हाल झाले. ICUमध्ये असणारे रुग्ण हे गंभीर असतात. त्यामुळे जास्त खळबळ उडाली. शेवटी लोकांनी खिडकीमधून कसं बसं त्या सगळ्यांना बाहेर काढण्यात यश मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली.
  Published by:Ajay Kautikwar
  First published: