हरिद्वार, 26 ऑगस्ट : देशातील वेगवेगळ्या राज्यात (
states) सध्या मान्सूनचा (
Monsoon) पाऊस कोसळत असून उत्तराखंडमध्ये (
Uttarakhand) अनेक ठिकाणी अतिवृष्टी (
Heavy rains) झाली आहे. परिणामी काही वेळातच नद्यांना पूर (
Flood to river) येत असून जनजीवन विस्कळीत होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. उत्तराखंडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे हरिद्वारमध्ये सुखी नदीला अचानक पूर आला आणि त्यात एक कार (
Car) वाहून गेली.
अशी घडली घटना
उत्तराखंड हा डोंगरांचा आणि दऱ्यांचा परिसर असल्यामुळे एका भागात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम दुसऱ्या भागावर झाल्याचं अनेकदा दिसतं. डोंगर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत अचानक वाढ होते आणि त्याचा परिणाम नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यावर झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.
नदीनं धारण केलं रौद्ररुप
गंगा नदीची उपनदी असणाऱ्या सुखी नदीला सहसा महापूर येत नाही. त्यामुळे या नदीच्या दोन्ही काठांवर असणाऱ्या रिकाम्या जागेत नागरिक आपल्या गाड्या पार्क करत असतात. या जागेचा वापर अनेकजण आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पार्क करण्यासाठी करतात. नेहमीप्रमाणेच एक कार या नदीच्या काठी पार्क करण्यात आली होती. मात्र उत्तराखंडमध्ये झालेल्या जोरदार पावसाचं पाणी सुखी नदीतून वाहत आलं आणि नदीला महापूर आला. या पुरामुळे काठावर लावलेली कार पाण्यात तरंगू लागली आणि पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे सरकू लागली.
हे वाचा -
पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीसोबत तालिबानची बैठक, दोन्ही गटांनी घेतला मोठा निर्णय
व्हिडिओमध्ये तरंगणाऱ्या या कारचं चित्र स्पष्ट दिसत आहे. ही कार नदीकाठी लावताना कारच्या मालकाने विचारही केला नसेल की पुढील काही तासांत एवढा भयानक पाऊस पडून नदीला महापूर येईल. मात्र काही तासांत नदीच्या पात्रातील पाणी वाढत गेलं आणि बघता बघता ही कार पाण्यावर तरंगू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेनंतर आता नागरिकांनी नदीकिनारी गाड्या लावण्याचा धसका घेतला असून नदीपासून दूर अंतरावर गाड्या पार्क करायला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.