• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • राडा! अफ्रिकी नागरिकांचा अचानक पोलीस ठाण्यावर हल्लाबोल, 53 जणांना अटक

राडा! अफ्रिकी नागरिकांचा अचानक पोलीस ठाण्यावर हल्लाबोल, 53 जणांना अटक

पोलीस ठाण्यावर हल्ला करून मारहाण आणि (53 African citizen arrested for breaking law and order) तोडफोड केल्याप्रकरणी 53 अफ्रिकी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : पोलीस ठाण्यावर हल्ला करून मारहाण आणि (53 African citizen arrested for breaking law and order) तोडफोड केल्याप्रकरणी 53 अफ्रिकी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. एका अफ्रिकी नागरिकांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यानंतर (Death of an African citizen in hospital) आक्रमक झालेल्या नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवले. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अफ्रिकी नागरिक झाले आक्रमक नैऋत्य दिल्लीतील मोहन गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका रुग्णालयात उपचारादरम्यान अफ्रिकी नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेची कल्पना पोलिसांना द्यावी, अशी विनंती रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या मित्रांना आणि नातेवाईकांना केली. मात्र पोलिसांना कल्पना न देताच मृतदेह घेऊन जाण्यासाठी अफ्रिकी नागरिक आग्रही होते. पोलीस ठाण्याच्या औपचारिकतेत वेळ न दवडता रुग्णालयाने थेट रुग्णाचा मृतदेह आपल्या ताब्यात द्यवा, अशी त्यांची मागणी होती. मात्र परदेशी नागरिकाचे प्रकरण असल्यामुळे नियमानुसार पोलीस ठाण्याला कल्पना दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात देता येणार नसल्याचा पवित्रा रुग्णालय प्रशासनानं दिला. पोलीस स्टेशनमध्ये राडा मृतदेह ताब्यात घेण्यासाठीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अफ्रिकन नागरिकांचा एक समूह मोहन गार्डन पोलीस ठाण्यापाशी आला. मात्र या दरम्यान काही नागरिक आक्रमक झाले आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली. पोलिसांनी इशारा दिल्यावर वातावरण अधिकच तापलं आणि नागरिकांनी पोलीस स्टेशनची आणि आजूबाजूच्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात केली. हा गोंधळ रोखण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि जमावाला नियंत्रणात आणलं. त्यानंतर 53 अफ्रिकी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. हे वाचा - जशास तसे: चीनच्या विमानांची तैवानमध्ये घुसखोरी, छोट्याशा देशाचं सडेतोड उत्तर सर्व आरोपी नायजेरियाचे दरम्यान, 29 सप्टेंबरला पोलिसांनी एका अवैध बारवर कारवाई करत पाच अफ्रिकी नागरिकांना अटक केली होती. त्यावेळी अटक करण्यात आलेले आणि गोंधळाप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व नागरिक हे नायजेरियाचे असल्याचं दिसून आलं आहे. हे सर्वजण अवैधरित्या भारतात राहत असल्याचंही दिसून आलं आहे. या सर्वांना आपापल्या देशांत परत पाठवण्यासाठीची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
  Published by:desk news
  First published: