मराठी बातम्या /बातम्या /देश /जम्मू काश्मीर : LoC जवळ गस्त घालताना तीन जवान दरीत कोसळले, बर्फाळ प्रदेशात घडली दुर्घटना

जम्मू काश्मीर : LoC जवळ गस्त घालताना तीन जवान दरीत कोसळले, बर्फाळ प्रदेशात घडली दुर्घटना

ट्रॅकवर बर्फ पडल्यानंतर 1 JCO (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) आणि 2 OR (इतर रँक) ची टीम खोल दरीत घसरली.

ट्रॅकवर बर्फ पडल्यानंतर 1 JCO (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) आणि 2 OR (इतर रँक) ची टीम खोल दरीत घसरली.

ट्रॅकवर बर्फ पडल्यानंतर 1 JCO (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) आणि 2 OR (इतर रँक) ची टीम खोल दरीत घसरली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jammu and Kashmir, India

कुपवाडा, 11 जानेवारी : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्तीदरम्यान लष्कराचे तीन जवान खोल दरीत पडले. या अपघातात तिन्ही जवान शहीद झाले. तिन्ही जवानांचे मृतदेह खोल दरीत बाहेर काढण्यात आले आहेत. लष्कराने सांगितले की, शहीद झालेल्या तीन जवानांमध्ये 01 JCO (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) आणि 02 OR यांचा समावेश आहे. ज्या भागात हे जवान दरीत पडले तो भाग बर्फाच्छादित असल्याचे सांगण्यात येत आहे.

चिनार कॉर्प्स, भारतीय सैन्याने एक निवेदन जारी केले की, नियमित ऑपरेशन टास्क दरम्यान, ट्रॅकवर बर्फ पडल्यानंतर 1 JCO (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) आणि 2 OR (इतर रँक) ची टीम खोल दरीत घसरली. तिन्ही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. नायब सूबेदार परषोत्तम कुमार, हवलदार अमरिक सिंह और जवान अमित शर्मा अशी तीनही शहीद झालेल्या जवांनाची नावे आहेत.

याआधी नोव्हेंबर महिन्यातही कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये अशीच एक घटना घडली होती. यामध्ये हिमस्खलनामुळे तीन जवान शहीद झाले होते. कुपवाडा पोलिसांनी सांगितले होते की, अल्मोडा चौकीजवळ हिमस्खलनामुळे 56 आरआरचे 3 जवान ड्युटीवर असताना शहीद झाले होते. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सौविक हाजरा, मुकेश कुमार आणि मनोज लक्ष्मण राव अशी शहीद जवानांची नावे आहेत. तिन्ही मृतदेह 168 MH ड्रगमुल्ला येथे पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा - Video : स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांनी अशी शिक्षा केली आता कधीही बसता येणार नाही वाहनात

हिमस्खलनात तीन जवान शहीद झाले होते -

कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जवानांची तुकडी गस्तीवर गेली होती, तेव्हा त्यांच्यावर बर्फाचा मोठा तुकडा पडला. शोध मोहिमेनंतर त्यांना शोधून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

First published:

Tags: Army, Indian army, Jammu and kashmir