कोरोनाचा कहर सुरूच! 24 तासांत 551 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

कोरोनाचा कहर सुरूच! 24 तासांत 551 रुग्णांचा मृत्यू, तर रुग्णांमध्ये पुन्हा झाली विक्रमी वाढ

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 8 लाख 49 हजार 553 झाला आहे. तर, 22 हजार 674 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जुलै : देशातील कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. दररोज रेकॉर्ड ब्रेक रुग्णांनी नोंद होत आहे, त्यामुळे कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारनुसार गेल्या 24 तासांत देशात 28 हजार 637 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 551 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 8 लाख 49 हजार 553 झाला आहे. तर, 22 हजार 674 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 2 लाख 92 हजार 258 सक्रीय रुग्ण आहेत. तर 5 लाख 34 हजार 620 रुग्ण निरोगी झाले आहेत. या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट हा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 62.92% आहे तर, सकारात्मकतेचा दर 10.22% आहे.

महाराष्ट्रात 8 हजार 139 नवीन प्रकरणं

महाराष्ट्राला राज्याला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. शनिवारी राज्यात 8 हजार 139 नवीन प्रकरणं आढळून आली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा यासह 2 लाख 46 हजार 600 झाला आहे. तर, 10 हजार 116 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 1, लाख 36 हजार 985 रुग्ण निरोगी झाले आहेत.

6 दिवसांत 1 लाख कोरोना रुग्णांची वाढ

सलग दहावा दिवस आहे जेव्हा देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 22,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आता कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. देशात संसर्गाची पहिली एक लाख प्रकरणे असून 110 दिवसांपर्यंत आले होते. ही संख्या आठ लाखांवर पोहचण्यासाठी केवळ 53 दिवस लागले आहेत. 3 जून रोजी देशातील कोविड – 19 मधील रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा जास्त होती, तर 3 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 दिवस लागले आणि 8 दिवसांनंतर 21 जून रोजी संक्रमितांची संख्या 4 लाखांहून अधिक झाली. यानंतर, पुढील एक लाख प्रकरणे अवघ्या सहा दिवसांत समोर आली आणि त्यातून पाच लाखांचा टप्पा ओलांडला. सात लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 दिवस लागले.

संपादन - प्रियांका गावडे

Published by: Priyanka Gawde
First published: July 12, 2020, 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading