मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING: 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीउर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा

BREAKING: 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीउर रहमान लख्वीला 15 वर्षांची शिक्षा

26/11 च्या हल्ल्याच्या मास्टरमाइंडला (Zaki ur Rehman Lakhvi) पाकिस्तानी कोर्टाने आता 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी संघटनांना पैसा पुरवल्याचा (Terror Funding) आरोप त्याच्यावर पाकिस्तानात ठेवला गेला होता.

नवी दिल्ली, 8 जानेवारी: मुंबईत हल्ला घडवून आणण्याचा प्लॅन घडवणारा (Master mind of 26/11 Mumbai attack) झाकीउर रहमान लख्वी (Zaki-ur-Rehman Lakhvi) पाकिस्तानात एका वेगळ्या गुन्ह्याखाली अटकेत होता. या 26/11 च्या हल्ल्याच्या मास्टरमाइंडला पाकिस्तानी कोर्टाने आता 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी संघटनांना पैसा पुरवल्याचा (Terror Funding) आरोप त्याच्यावर पाकिस्तानात ठेवला गेला होता. त्याचीच सुनावणी होऊन त्याला पाक कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे.

UN नेसुद्धा झाकीउर रहमान लख्वीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. पण त्याच्यावर पाकिस्तानने अद्याप कारवाई केलेली नव्हती. आता पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यामुळे त्यांनी 2 जानेवारीला त्याला अटक केली आणि खटला चालवला. थोड्याच दिवसात फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सची (FATF) बैठक होणार आहे. दहशतवादी कृत्याला पाठिंबा देणाऱ्या किंवा रसद पुरवणाऱ्या संस्थांवर कारवाई केली नाही, तर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकायचे संकेत या टास्क फोर्सने अगोदरच दिले आहेत. या कारवाईच्या भयाने पाकिस्तानने आता दहशतवाद्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणून भारताने लख्वीचं नाव अगोदरच घोषित केलं होतं. पण पाकिस्तानने त्याला अटक केली नाही आणि भारताच्या ताब्यात तर दिलंच नाही. तो 26/11 च्या मुख्य आरोपींपैकी एक असला, तरी त्याला पाकिस्तानात एकदा अटक करून जामिनावर सोडण्यात आलं होतं. गेल्या चार वर्षांपासून तो मुक्तपणे फिरत होता. आंतरराष्ट्रीय दबावामुळे काही दिवसांपूर्वी त्याला पुन्हा अटक केली.

First published:

Tags: 26/11 mumbai attack, Pakistan, Terrorist