जाहिरात
मराठी बातम्या / देश / भाजपला धक्का; युपीत सायकल सुसाट,'हात'ही उंचावला

भाजपला धक्का; युपीत सायकल सुसाट,'हात'ही उंचावला

भाजपला धक्का; युपीत सायकल सुसाट,'हात'ही उंचावला

16 सप्टेंबर : : मोदी सरकारची सत्र परीक्षा समजल्या जाणार्‍या तीन लोकसभा आणि विधानसभेच्या 33 जागेसाठीचा निकाल हाती येत आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालावरुन मोदींची लाट ओसरली असल्याचं दिसून येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा सायकल ‘सुसाट’ धावलीये तर काही ठिकाणी काँग्रेसचाही ‘हात’ उंचावलाय. 9 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. गुजरात वगळता भाजपला इतर राज्यांमध्ये जोरदार धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात भाजपला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागतंय, तर समाजवादी पक्षाला तब्बल 9 जागांवर यश मिळवलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :
    bjp sp congress

    16 सप्टेंबर : : मोदी सरकारची सत्र परीक्षा समजल्या जाणार्‍या तीन लोकसभा आणि विधानसभेच्या 33 जागेसाठीचा निकाल हाती येत आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालावरुन मोदींची लाट ओसरली असल्याचं दिसून येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा सायकल ‘सुसाट’ धावलीये तर काही ठिकाणी काँग्रेसचाही ‘हात’ उंचावलाय.

    9 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. गुजरात वगळता भाजपला इतर राज्यांमध्ये जोरदार धक्का बसला आहे.  उत्तर प्रदेशात भाजपला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागतंय, तर समाजवादी पक्षाला तब्बल 9 जागांवर यश मिळवलंय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशावर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यामुळे या अपयशामुळे भाजपला मोठाच धक्का बसलाय.

    जाहिरात

    राजस्थानातही भाजपला 4 पैकी फक्त 1 जागा जिंकता आली आहे. तर 3 जागा मिळवत काँग्रेसने गेलेली शान पुन्हा मिळवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलंय. गुजरातमध्ये भाजपला 6 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपला एका जागेवर यश मिळालंय. या निकालानंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या जातीयवादी धोरणावर टीका केलीये.

    तर राजस्थानात मिळालेल्या यशामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आधी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर कार्यकर्ते खचले होते. मात्र, या पोटनिवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर कार्यकर्ते उत्साहात आले आहेत.

    बडोद्याची प्रतिष्ठेची लोकसभेची जागा भाजपने जिंकली आहे. भाजपच्या उमेदवाराला 1 लाखापेक्षा जास्त आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून जोरदार जल्लोष केला.

     चार राज्यांत पोटनिवडणुका उत्तर प्रदेश

    • समाजवादी पक्ष - 9
    • भाजप - 2

    गुजरात

    • भाजप - 6
    • काँग्रेस - 3

    राजस्थान

    • काँग्रेस - 3
    • भाजप - 1

    प. बंगाल

    • तृणमूल काँग्रेस - 1
    • भाजप - 1

     +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: RJD
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात