09 सप्टेंबर : आयबीएन लोकमतच्या शिरपेचा आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेच्या रामनाथ गोयंका पुरस्कारात आयबीएन लोकमतनं आपली घोडदौड कायम राखत पुरस्कारात नवा विक्रम प्रस्थापित केलाय. यंदा आयबीएन लोकमतला 4 रामनाथ गोयंका पुरस्कार मिळाले असून ‘चार चाँद’ लावले आहे.
आमचे सिनिअर असोसिएट एडिटर विनायक गायकवाड यांना ‘नादखुळा फुटबॉल’ या ग्रामीण भागात फुटबॉलची लोकप्रियता दाखवणार्या विशेष कार्यक्रमासाठी पुरस्कार मिळालाय. तर प्राजक्ता धुळप यांना प्रादेशिक भाषांमधल्या उत्तम पत्रकारितेसाठी सन्मानित करण्यात आलंय. आरती कुलकर्णी यांच्या ‘हिरवं कोकण’ आणि अलका धुपकर यांच्या ‘उसनं मातृत्व’ या दोन्ही कार्यक्रमांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक हिंदी-इंग्रजी वाहिन्यांशी स्पर्धा करत पुरस्कार मिळवले आहेत. विशेष म्हणजे आरती कुलकर्णी यांना दुसर्यांदा रामनाथ गोयंका पुरस्कार मिळालाय. पत्रकारितेतल्या प्रतिष्ठित अशा रामनाथ गोएंका पुरस्कारात सलग पाचव्या वर्षी आयबीएन लोकमतनं हे यश मिळवलंय.
रामनाथ गोयंका पुरस्कार
- विनायक गायकवाड - नादखुळा फुटबॉल
- प्राजक्ता धुळप - उत्तम पत्रकारिता (प्रादेशिक भाषा)
- आरती कुलकर्णी - हिरवं कोकण
- अलका धुपकर - उसनं मातृत्व
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++