नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना: मुलाच्या मृत्यूनंतर सरकारनं दिलेले 10 लाख घेऊन सून फरार, वयोवृद्ध दाम्पत्य वाऱ्यावर

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना: मुलाच्या मृत्यूनंतर सरकारनं दिलेले 10 लाख घेऊन सून फरार, वयोवृद्ध दाम्पत्य वाऱ्यावर

काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती (Oxygen Leak Accident) झाली होती. या दुर्घटनेत 21 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला होता.

  • Share this:

नाशिक, 19 जून: काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) येथील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती (Oxygen Leak Accident) झाली होती. या दुर्घटनेत 21 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी तडफडून मृत्यू झाला होता. या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. या दुर्घटनेनंतर महापालिकेनं आणि राज्यसरकारनं प्रत्येकी पाच लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला होता. अशी ही दहा लाख रुपयांची सरकारनं केलेली मदत सुनेनं हडपून सासू सासऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची घटना समोर आहे.

सून पैसे घेऊन फरार झाल्याचं कळताच हतबल झालेल्या वयोवृद्ध दाम्पत्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडे मदत याचना केली आहे. ऑक्सिजन गळती दुर्घटनेत एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर किमान सरकारनं दिलेली मदत आधार ठरेल असं वाटत होतं.मात्र, सुनेनं मिळालेली सर्व रक्कम परस्पर गायब केल्याने वृद्ध आई वडील हतबल झाले आहेत.

पिरसिग महाले आणि लता महाले असं या निराधार दाम्पत्याचं नाव आहे. संबंधित दाम्पत्याच्या सुनेनं मदत निधीच्या कागदपत्रांवर बळजबरीनं दोघांची सही आणि अंगठ्याचा ठसे घेतले आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारावर तिनं शासनाकडून मिळालेली सर्व आर्थिक मदत लांबवली आहे. पैसे हातात पडताच तिनं सासू सासर्‍यांना वाऱ्यावर सोडून पोबारा केला आहे. यामुळे संबंधित दाम्पत्य निराधार झालं आहे.

हेही वाचा-सांगलीतील कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ; 205 पैकी 87 जणांचा मृत्यू

खरंतर नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाली होती. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर, दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात यश आलं. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. याठिकाणी 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 21 जणांचा मृत्यू झाला होता.

Published by: News18 Desk
First published: June 19, 2021, 3:10 PM IST

ताज्या बातम्या