नाशिक, 19 ऑगस्ट : नाशिक शहरात 'नो हेल्मेट नो पेट्रोल' (No Helmet No Petrol) ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट पासून ही मोहिम सुरू करण्यात आली असून पेट्रोल नसलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी नागरिक या नियमाला बगल देत पळवाट शोधून काढत असल्याचं दिसत आहे. त्यातच आता नाशकातील एका पेट्रोल पंपावरील धक्कादायक सीसीटीव्ही (Petrol Pump Employee beaten by bike rider) समोर आला आहे.
नाशकातील म्हसरुळ परिसरात असलेल्या ईच्छामणी पेट्रोप पंपावर हेल्मेट नसल्याने बाईकस्वाराला पेट्रोल देण्यास कर्मचाऱ्याने नकार दिला. याचा राग आल्याने संतप्त झालेल्या या दुचाकीस्वाराने थेट पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही संपूर्ण घटना बुधवारी सायंकाळी घडली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
VIDEO: हेल्मेट नसल्याने पेट्रोल देण्यास नकार, टोळक्याची पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण pic.twitter.com/ocJ9hr7DYD
— News18Lokmat (@News18lokmat) August 19, 2021
पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वाराला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने हेल्मेटची विचारणा केली. यावेळी दुचाकीस्वाराला प्रचंड राग आला आणि त्यानंतर त्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण देखील करण्यात आली.
हेल्मेट नसल्यास दुचाकीस्वारांना पेट्रोल देण्यात येणार नाही अशी मोहिम नाशकात 15 ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी नागरिक या नियमांचे उल्लंघन करत आहेत. पेट्रोल भरण्यासाठी एकमेकांकडून हेल्मेट तात्पुरते घेत असल्याचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Crime, Nashik