सोशल मीडियावर (Social media) स्वतःला टिकटॉक स्टार (Tiktok star) म्हणवून घेणाऱ्या समीर खान सलीम खान (वय-19, पाचपावली) तरुणानं आपल्या अल्पवयीन प्रेयसीला धावत्या दुचाकीवर मारहाण केल्याची (Beat minor girlfriend on running bike) घटना समोर आली आहे. तिला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Viral video) केला आहे.
18 जूनला समीरने तरुणीला कमाल टॉकीज चौकात भेटायचे आहे म्हणून बोलावले. त्यानंतर तिचे अपहरण केले. चालत्या मोटरसायकलवर तिला अपहरण करून मारहाण करत नेतानाचा व्हिडीओ शूट केला आणि मुलीचे लैगिक शोषण केले.
समीर खान सलीम खान (वय-19, पाचपावली) (Samir khan Tiktok star) आणि मोहम्मद शाकिन मोहम्मद सिद्दिकी (वय-25, यशोदानगर) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. स्वतःला टिकटॉक स्टार म्हणवून घेत चमकोगिरी करत फिरणाऱ्या समीरचं एका अल्पवयीन मुलीसोबत मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान एका वाढदिवसाच्या पार्टीत समीरची प्रेयसी अन्य एका तरुणासोबत सलगी करताना दिसली.
त्यामुळे संतापलेल्या समीरनं आपल्या अल्पवयीन प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी 18 जून रोजी तिचं अपहरण केलं. यासाठी त्यानं आपला मित्र शाकिनची मदत घेतली. दोघांनी अल्पवयीन पीडितेला जबरदस्तीनं दुचाकीवर बसवलं. त्यानंतर आरोपी समीरनं पीडितेला चालत्या दुचाकीवर मारहाण करण्यास सुरुवात केली. तर समीरचा मित्र शाकिननं या घटनेचा व्हिडीओ बनवला. यानंतर आरोपीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड करत तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडीओ समोर येताच, गुन्हे शाखेच्या पथकानं मुख्य आरोपीसह त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक (2 Arrest) केली आहे. पीडित तरुणीचे दुसऱ्यांसोबत प्रेमसंबंध (Love affair) सुरू झाल्याच्या संशयातून आरोपींनी ही मारहाण केल्याचं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.