मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

निरी संस्थेचं मोठं संशोधन; आता कोरोना टेस्टसाठी स्वॅबची गरज नाही, गुळण्यांच्या माध्यमातून घेता येणार नमुने

निरी संस्थेचं मोठं संशोधन; आता कोरोना टेस्टसाठी स्वॅबची गरज नाही, गुळण्यांच्या माध्यमातून घेता येणार नमुने

सध्या नागपूरमध्ये याची सुरवात होणार असून पुढे मोठ्या प्रमाणात देशाच्या वेगवेगळ्या भागात याचा वापर करण्याची आयसीएमआरने निरीला दिली आहे.

नागपूर, 19 मे: नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) (Neeri) ने कोविड टेस्ट (Covid19 Test) संदर्भात एक मोठे संशोधन केले आहे. आता यापुढे कोविड टेस्टसाठी नाकातून किंवा घशातून नमुने (Swab test) घेण्याची गरज पडणार नाही. एक गुळलीच्या माध्यमातून कोविड टेस्ट नमुने घेता येणार आहे. याला "सलाईन गारगल" (Saline Gargle) RTPCR टेस्ट असे नाव देण्यात आले. यामुळे रुग्णाच्या नाकावाटे व घशावाटे घेतले जाणारे नमुने देतांना होणार त्रास कमी होणार आहे.

याआधी अनेक नागरिकांना नाकावाटे व घशा वाटे नमुने देतांना इजा झाल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. अनेकांना नाकावाटे किंवा घशावाटे नमुने देतांना हायपर टेन्शनचा त्रास होत होता तो त्रास यापुढे बंद होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) ने कोविड टेस्टिंग संदर्भात केलेले हे संशोधन महत्वाचे व उपयुक्त मानले जात आहे. सोबतच या टेस्टिंग प्रक्रियेत  RNA extraction किटची गरज नाहीशी होणार असल्याने कमी वेळात कोविडचा अहवाल प्राप्त आहे.

" isDesktop="true" id="553000" >

कोरोनाच्या नवसंजीवनीबाबत कंपनीने केलं सावध! 2DG औषधाबाबत दिली नवी अपडेट

ICMR ने या संशोधनाला मान्यता  दिली असून इतर प्रयगोशाळेना या संदर्भात माहिती व मदत करण्याच्या सूचना निरीचे संशोधक डॉ कृष्णा खैरनार यांनी दिली आहे. याचा दुसरा फायदा असा देखील होणार आहे की टेस्टसाठी नमुने देण्याची प्रक्रिया सोपी झाल्याने ट्रेन मॅन पवार ची टेस्टिंग सेंटर वर गरज भासणार नाही. रुग्ण स्वत: आपल्या गुळलीच्या माध्यमातून सहज नमुने घेऊन लॅबमध्ये किंवा कलेक्शन सेंटरला देऊ शकणार आहे.

" isDesktop="true" id="553000" >

सध्या नागपूरमध्ये याची सुरवात होणार असून पुढे मोठ्या प्रमाणात देशाच्या वेगवेगळ्या भागात याचा वापर करण्याची आयसीएमआरने निरीला दिली आहे. तिसरी महत्वाची गोस्ट ही की टेस्टिंग सेंटरवर होणारी गर्दी टाळण्यास देखील मदत होणार असल्याने टेस्टिंग दरम्यानचा संक्रमणाचा धोका कमी होणार आहे.

First published:

Tags: Coronavirus, Nagpur