जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / Good News: 'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्रात दाखल; Oxygen तुटवडा होणार दूर

Good News: 'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्रात दाखल; Oxygen तुटवडा होणार दूर

Good News: 'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्रात दाखल; Oxygen तुटवडा होणार दूर

महाराष्ट्रासाठी वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन येणारी एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नागपूरमध्ये या एक्सप्रेसवरील 3 टँकर उतरवण्यात आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 23 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यासाठी आता परराज्यांतून ऑक्सिजन आणण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railways) माध्यमातून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस (First Oxygen Express) चालवण्यात आली. ही एक्सप्रेस ऑक्सिजनचे टँकर्स घेऊन राज्यात दाखल झाली आहे. या एक्सप्रेसवर एकूण सात टँकर्स आहेत. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना ऑक्सिजन अपुरे पडत असल्याने विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणले जात आहे. त्यासाठी देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस नागपूरात दाखल झाली आहे. नागपूर येथे या एक्सप्रेसमधून 3 टँकर्स उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित चार टँकर्स हे नाशिक रोड स्टेशन येथे उतरवण्यात येणार आहेत. ही ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल होईल.

जाहिरात

मोठा दिलासा! आज राज्यातील 74,045 रुग्णांची कोरोनावर मात ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून रेल्वेने महाराष्ट्रात ऑक्सिजन आणण्यात आला आहे. यामुळे आता हा वैद्यकीय ऑक्सिजन राज्यातील आवश्यक असलेल्या रुग्णालयांत पाठवण्यात येईल आणि यामुळे शेकडो कोरोना रुग्णांचे प्राण वाचणार आहे हे निश्चित. गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान सुद्धा भारतीय रेल्वेने अत्यावश्यक असलेल्या वस्तूंचा रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील विविध भागांत पुरवठा केला होता. त्याच प्रमाणे यावेळी सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी धावली आहे. ऑक्सिजन उत्पादकांसोबत पंतप्रधानांची चर्चा देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील आघाडीच्या ऑक्सिजन उत्पादकांसोबत चर्चा केली. ऑक्सिजन उत्पादकांनी गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या उत्पादनात वाढ केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. ऑक्सिजन उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने उचललेली अनेक पावले त्यांनी जाणून घेतली. देशातील वैद्यकीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी औद्योगिक ऑक्सिजन वैद्यकीय क्षेत्रासाठी वळवल्याबद्दल मोदींनी उद्योगांचे आभार मानले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात