नागपूर, 04 जून: नागपूर (Nagpur)च्या खापा वन परिक्षेत्रात 4 वर्षाची मादी (Female leopard) बिबट्या आणि तिच्या 4 महिन्याचा पिल्लाचा मृतदेह आढळून आला आहे. कोरड्या नाल्यात हे दोन्ही मृहदेह आढळून आलेत कोरड्या नाल्यात मृतदेह आढळून आल्यानं भुकेमुळं यांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या मृत्यू प्रकरणी वन विभाग शवविच्छेदन करून पुढील तपास करत आहे.
नागपुरात 4 वर्षांची मादी बिबट्या आणि 4 महिन्याच्या पिल्लाचा मृत्यू pic.twitter.com/TvTPEIsnTD
— News18Lokmat (@News18lokmat) June 4, 2021
मोहगाव- पेंढरी नाला बिटातील कोथुळना सहवन परिक्षेत्र खुबाळा येथे हे मृतदेह आढळले. वन कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसल्यानं त्यांनी याची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली. या पिल्लाचे सर्व अवयव जशाच्या तसे होते. हेही वाचा- नाशिकच्या ग्रामीण भागातून एक दिलासा देणारी बातमी भुकेमुळे किंवा उष्माघातामुळे दोघांचाही मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोघांच्या शरीराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं खापा आणि वन परिक्षेत्र अधिकारी पी.ए. नाईक यांनी सांगितलं.