कोरोना...नापिकी...बँकेचं वाढलेलं कर्ज; अवघ्या 87 हजारांपायी शेतकऱ्याचा गेला जीव

कोरोना...नापिकी...बँकेचं वाढलेलं कर्ज; अवघ्या 87 हजारांपायी शेतकऱ्याचा गेला जीव

स्वत:च्या शेत शिवारात या 57 वर्षाच्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

  • Share this:

वाशिम, 24 मे : सततची नापिकी आणि बँकेचं वाढलेलं कर्ज तसेच यंदा खरीपातील पेरणी कशी करावी या विवंचनेत असलेल्या फुलउमरी येथील 57 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. आधीच नागरिकांच्या डोक्यावर कोरोनाचं संकट घोंगावत आहे. अशात तौत्के चक्रीवादळामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. (Only for 87 thousand farmers suicide)

वाशिम जिल्ह्यातील फुलउमरी येथील वसंत जाधव ( वय 57 ) यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती असून त्यांच्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 87 हजार रुपये कर्ज असल्याचं कुटुंबातील  सदस्यांनी सांगितलं. हे कर्ज कसे फेडायचे आणि येणाऱ्या खरीप हंगामात पेरणी कशी करावी, या विवंचनेत असल्यानं त्यांनी शेत शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. (Only for 87 thousand farmers suicide)

हे ही वाचा-फक्त 20 रुपयांसाठी तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या, उल्हासनगर हादरलं

दरम्यान शेतकरी आत्महत्या झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात शेतकरी आत्महत्येचा तपास मानोरा पोलीस करत आहेत. या शेतकऱ्याची फुलउमरी शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या वृत्तामुळे गावभरात खळबळ उडाली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 24, 2021, 5:19 PM IST

ताज्या बातम्या