नागपूर, 21 मे : भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोरोना लशीची आता लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल लवकरच सुरू होणार आहे. देशात चार ठिकाणी ही क्लिनिकल ट्रायल (Clinical trials) होणार आहे. एम्स दिल्ली, एम्स पाटणा, निलोफर हॉस्पिटल हैद्राबाद आणि मेडिट्रीना हॉस्पिटल नागपूर येथे या क्लिनिकल ट्रायल होणार आहेत. नागपुरातील मेडिट्रीना हॉस्पिटलला 0 ते 18 वर्ष वयोगटातील लहान मुलांच्या या क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाली आहे. लोकल इथिकल कमिटीची एक मिटिंग झाली असून त्यातून फायनल मंजुरी मिळाल्यानंतर लगेच या ट्रायलला सुरुवात होणार आहे. देशात या क्लिनिकल ट्रायलचे तीन भाग करण्यात आले असून 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना ट्रायलमध्ये सामावून घेतलं जाणार आहे. तीन गटात 2 ते 6 वर्ष, 6 ते 12 वर्ष आणि 12 ते 18 वर्ष असे भाग करण्यात आले आहेत. लहान मुलांवरील लस ही इंट्रामस्कुलर असणार आहे, ज्याचे 2 डोस होणार आहेत. पहिला डोस झाला की 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांच्या रक्ताची तपासणी होणार असून त्यांच्या पालकांचे कंसेंट झाल्यावरच त्यांच्या मुलांवर ही क्लिनिकल ट्रायल होणार आहे. लोकांनी आपल्या मुलांना यात सहभागी करावे असं आवाहन मेडिट्रीना हॉस्पिटलचे संचालक डॉ. समीर पालतेवार यांनी केलं आहे. हे वाचा - तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन रिलायन्स हॉस्पिटलने उभी केली लहान मुलांसाठी विशेष सुविधा नागपुरात क्लिनिकल ट्रायल ही बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळदकर यांच्या देखरेखीखाली होणार आहे. यामध्ये सुरुवातीला स्टडी सॅम्पल घेण्यात येतील, ज्या मुलांवर परिणाम चांगले असतील त्यांना 28 दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे. देशातील चार ठिकाणी 208 दिवस हे ट्रायल चालणार आहे. एकूण 525 मुलांचे क्लिनिकल ट्रायल होणार असून त्याची तीन वयोगटात विभागणी करण्यात येणार आहे. म्हणजेच 2 ते 6 वर्ष वयोगटातील 175 मुलांना, 6 ते 12 वर्ष वयोगटातील 175 आणि 12 ते 18 वर्ष वयोगटातील 175 मुलांवर ही क्लिनिकल ट्रायल पार पडणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.