नागपूर, 10 मे: नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर (railway station)संध्याकाळच्या सुमारास एका बॅगमध्ये स्फोटके (Bomb) आढळून आली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकानं (Police And Bomb Disposal Squad) घटनास्थळी धाव घेतली असून बॅग ताब्यात घेतली. संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या मुख्य दाराच्या बाजूला असलेल्या पोलीस बूथजवळ एका बॅगमध्ये 56 जिलेटिनच्या काड्या सापडल्या. त्या काड्या एका सर्किटमध्ये जोडलेल्या होत्या. नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथक म्हणजेच बीडीडीएसने ती बॉम्ब सदृश वस्तू ताब्यात घेऊन डिफ्यूज करण्यासाठी पोलीस मुख्यालय परिसरात नेली. बॉम्ब सदृश वस्तूमध्ये एक छोटे डेटोनेटर आणि लो intensity च्या स्फोटकांचा 56 छोट्या काड्या एकमेकांशी सर्किटनं जोडलेल्या स्वरूपात होते. नवनीत राणांचा व्हायरल फोटो लिलावती रुग्णालयाला पडणार भारी, पालिकेनं धाडली नोटीस बीडीडीएसला सुरुवातीला जिवंत बॉम्बसारखे वाटल्यामुळे ती बॉम्ब सदृश वस्तू रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ताब्यात घेऊन बीडीडीएसच्या खास गाडीमध्ये पोलीस मुख्यालय परिसरात नेण्यात आलं होतं. त्यानंतर तेथे त्याला निष्क्रिय करण्यात आले. ही बॉम्ब सदृश्य वस्तू नागपूर रेल्वे स्थानक परिसरात कोणी आणली? का आणली? त्या पाठीमागे ठेवणाऱ्याचा काय उद्देश होता. याचा तपास आता नागपूर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.