डोंबिवली, 13 जून: मागील काही दिवसांपासून देशात इंधनाचे दर गगनाला भीडत आहे. सध्या मुंबईसह उपनगरात पेट्रोल 102 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. देशात इंधनाच्या दराने शंभरी गाठल्यानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल -डिझेलचे दर आवाक्यात आणण्यासाठी सर्व स्तरातून मागणी केली जात आहे. पण सरकार सामान्य नागरिकांच्या या मागणीकडे कानाडोळा करताना दिसत आहे. इंधनाचे दर वाढल्याने सामान्य नागरिकांचे सरळसरळ आर्थिक शोषण केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या काही नेत्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळी (13 जून) 10 ते 12 च्या दरम्यान डोंबिवली याठिकाणी ग्राहकांना 1 रुपया प्रतिलिटर दराने पेट्रोल विकलं जाणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेच्या काही नेत्यांकडून हा प्रयोग करण्यात येत आहे. डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर अवघ्या एक रुपयात एक लीटर पेट्रोल विकलं जाणार आहे. पण निर्धारित कालावधीत येणाऱ्या ग्राहकांनाच 1 रुपया दराने पेट्रोल दिलं जाणार आहे. याठिकाणी मिळेल 50 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल कल्याण युवा सेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत 1 रुपया पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याचबरोबर अंबरनाथमधील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अशीच योजना जाहीर केली आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील येथील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर आज सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांना 50 रुपये प्रतिलीटरने पेट्रोल विकलं जाणार आहे. हे ही वाचा- सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण! आता केलेली गुंतवणूक काही महिन्यात करेल मालामाल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवला जात असला तरी, किमान त्या निमित्ताने तरी डोंबिवली आणि अंबरनाथ येथील सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







