सुशांत प्रकरणात सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल करणार का ठाकरे सरकार? अजूनही निर्णय गुलदस्त्यात

सुशांत प्रकरणात सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल करणार का ठाकरे सरकार? अजूनही निर्णय गुलदस्त्यात

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा करणाऱ्या मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने CBI कडे पुढील तपास सोपविल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांबरोबर विरोधकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर सीबीआय चौकशीची मागणी जोर धरत होती. त्यातच आज सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर आता अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्य सरकार सीबीआय तपासाला सहकार्य करेल असे ते यावेळी म्हणाले. मुंबई पोलिसांच्या तपासात कुठेही दोष नसून त्यांनी योग्य प्रकारे तपास केल्याचे देशमुख यावेळी म्हणाले. पुढे गृहमंत्री यांनी सुशांत प्रकरणात राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'संघराज्याची संकल्पना, त्याबाबत घटनातज्ज्ञांनी मंथन करावं, विरोधकांचं बिहार निवडणुकीसाठी राजकारण चाललं आहे. राज्य सरकार समकक्ष तपास करेल.

हे वाचा-IVE : सुशांत प्रकरणाचा तपास CBI कडे; महाराष्ट्र फेरयाचिका करणार का?

सुशांत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्याबाबत गृहमंत्र्यांनी होकार दिलेला नाही. दुसरीकडे सहपोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुशांत प्रकरणाबाबत कायदेतज्ज्ञांच्या टीमशी बोलणे सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्यापही ठाकरे सरकारने याबाबत निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे. गृहमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत फेरयाचिकेबाबत खुलासा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही ठाकरे सरकारने याबाबतचा निर्णय घेतला नसल्याचे दिसून येते.

Published by: Meenal Gangurde
First published: August 19, 2020, 6:52 PM IST

ताज्या बातम्या