मुंबई, 16 सप्टेंबर : महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यावर नाराज असल्याचं समोर आलं आहे. आव्हाडांनी ट्विट्सच्या (Jitendra Awhad tweets) माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतल्या एका जमिनीबाबत ही नाराजी असल्याचं त्यांच्या ट्विट्समधून दिसून येत आहे. क्रिकट्रॅकर या वेबसाइटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जितेंद्र आव्हाडांच्या ट्विट्समध्ये म्हटल्याप्रमाणे, 30 वर्षांपूर्वी म्हाडामार्फत (MHADA) सुनील गावस्कर क्रिकेट फाउंडेशन ट्रस्टला (Sunil Gavaskar foundation trust) मुंबईमध्ये काही जागा देण्यात आली होती. या ठिकाणी एक क्रिकेट अॅकॅडमी (Land for cricket academy) सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांना ही जागा भाडेतत्त्वावर दिली गेली होती; मात्र अद्यापही या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही अॅकॅडमी सुरू झाली नसल्यामुळे गृहनिर्माण मंत्री (Housing minister) आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आपण ही जमीन गावस्करांकडून परत घेणार होतो; मात्र त्यांचं भारतीय क्रिकेटमधलं योगदान पाहता हा विचार बदलल्याचं आव्हाडांनी ट्विट्समध्ये म्हटलं आहे. हे ही वाचा- नीती आयोगाने केले महाराष्ट्राच्या कामगिरीचे कौतुक, मुख्यमंत्री म्हणाले…
जर सुनिल गावस्कर नसता तर कदाचित त्याला आज देण्यात आलेला म्हाडाचा प्लॉट मी रद्द केला असता. ज्या दिवशी सुनिल गावस्कर फिलिप्स डिफ्रायटेस च्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाला. त्या दिवसापासून जवळ-जवळ माझा क्रिकेट मधला इंटरेस्टच संपला. स्टेडियम मधून रडत बाहेर पडलो होतो
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 15, 2021
आव्हाड लिहितात, “बांद्रा पूर्व क्षेत्रामध्ये ही दोन हजार स्क्वेअर मीटर (Bandra east plot for academy) जागा आहे. अशा मोक्याच्या ठिकाणी असणारी एवढी मोठी जागा तशीच पडून आहे. अद्याप या ठिकाणी कसलीही क्रिकेट अॅकॅडमी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे मी गावस्कर ट्रस्टला ही जमीन देण्याचा निर्णय रद्द करणार होतो. ही जमीन ट्रस्टकडून परत घेऊन, म्हाडाला (Maharashtra Housing and Area Development Authority) देण्याचा माझा विचार होता; मात्र गावस्कर यांचं क्रिकेटमध्ये असलेलं योगदान (Gavaskar’s contribution to cricket) पाहता मी असा निर्णय घेतला नाही.” “मी सुनील गावस्कर यांना क्रिकेटचा देव मानतो. केवळ त्यांच्यामुळेच मी तडकाफडकी निर्णय घेतला नाही. त्यांच्याऐवजी इतर कोणाकडून असं झालं असतं, तर गृहनिर्माण मंत्री म्हणून मी हा करार रद्द केला असता. त्यांनी फिलिप्स डेफ्रैटिसला (Gavaskar and Philips Defraitis) क्लीन बोल्ड केलं होतं तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही. मी तेव्हा स्टेडियममधून साश्रूनयनांनी बाहेर पडलो होतो. त्यामुळे आता तरी किमान त्यांनी या जागेचा सदुपयोग करावा,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विट्समधून म्हटलं आहे. गावस्कर यांचं भारतीय आणि एकूणच क्रिकेटला मोठं योगदान राहिलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणारे ते जगातले पहिले बॅट्समन (First person on planet to score 10 thousand runs in test) आहेत. एकूण 125 कसोटी आणि 108 वनडे मॅचेस खेळून त्यांनी 13 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 35 शतकांचा आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी क्रिकेटची साथ सोडली नाही. आता ते समालोचक म्हणून काम करतात.