मास्क न घालण्यावरून उद्धव यांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला!

मास्क न घालण्यावरून उद्धव यांचा राज ठाकरेंना सणसणीत टोला!

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला असून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

  • Share this:

मुंबई, 2 एप्रिल : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. आज राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली जाणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला असून येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीकरण, इतर देशांची परिस्थिती, आदी विषयांवर भूमिका मांडली.

विरोधकांबरोबरच यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मास्क न वापरणं यात काय शौर्य?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांचं नाव घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

आतापर्यंत अनेक कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे विनामास्क दिसले होते. तर मी मास्क घालत नाही, असंही ते एका कार्यक्रमात म्हणाले होते. यानंतर मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी राज ठाकरेंना मास्क घालण्याचं आवाहन केलं होतं.

हे ही वाचा-मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचा इशारा, दोन दिवसांत घेणार निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-मुख्यमंत्र्यांनी आज लॉकडाऊनचा इशारा दिला असून येत्या दोन दिवसात दृश्य स्वरुपात नियंत्रण झाल्याचं दिसलं नाही तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन आपण टाळू शकतो, मात्र त्यासाठी जिद्द ठेवायला हवी. मी येत्या दोन दिवसात आणखी काही जणांशी बोलणार.

-लॉकडाऊन व्यतिरिक्त इतर काय पर्याय असेल यावर तज्ज्ञांशी बोलून ठरविण्यात येईल. सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करीत आहे की, यात राजकारण करू नका. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे.

-मुख्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी यंदाही उपमुख्यमंत्र्यांनी चांगला अर्थसंकल्प मांडला. संकटातही महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही. काही दिवसांपूर्वी होळी, धुळीवंदनानंतर राज्यात शिमग्याला सुरुवात झाली. मात्र त्याविषयी नंतर बोलता येईल. मी तुम्हाला सातत्याने लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली आहे. ही शक्यता अजूनही टळलेली नाही. गेल्या वर्षी राज्यातील सर्व नागरिकांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्यानुसार अंमलबजावणी केली."

Published by: Meenal Gangurde
First published: April 2, 2021, 9:27 PM IST

ताज्या बातम्या