मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांच्या मौनाचा राजकीय अर्थ काय?

सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांच्या मौनाचा राजकीय अर्थ काय?

बाळासाहेब थोरातांच्या मौनाचा राजकीय अर्थ काय?

बाळासाहेब थोरातांच्या मौनाचा राजकीय अर्थ काय?

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 जानेवारी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबे यास नाशिक पदवीधर निवडणुकीत उभं केलंय. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झालाय. यावर काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त करत आम्ही सत्यजित तांबे यांना मदत करणार नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, तांबेंच्या बंडखोरीवर अद्याप माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मौन बाळगून आहेत. यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी जर गडबड होऊ शकते असे सांगितले होते तर त्यावर थोरात गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात सर्वात संयमी आणि शांत नेते म्हणून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे पहिले जाते. राज्यात काहीही झाले तरी विचारपूर्वक बोलणारे बाळासाहेब थोरात सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारणही तसेच आहे. काँग्रेसचे नेते असलेले सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या तांबेंना बंडखोरी का करावी लागली? मामांनी भाचाला जाणीवपूर्वक बाजूला केलं होतं का? म्हणून तर भाचा सत्यजित तांबे यांनी मामाचा हात सोडला का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

वाचा - 'उद्धव साहेब, तिळगुळ घ्या' शिंदे गटाच्या आमदाराला आठवली 'मातोश्री'

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मतदार संघात त्यांची कन्या डॉ. जयश्री थोरात या एकविरा फाउंडेश आणि इतर संस्थेच्या माध्यमातून सध्या राजकीय धडे गिरवत आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे अस्वस्थ आहेत का? विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार जर बाळासाहेब थोरात यांना कल्पना दिली होती हे खरे असेल तर या बंडाला थोरात यांचा छुपा पाठींबा आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

सत्यजित तांबे यांच्या पुस्त्तक प्रकाशनच्या वेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले होते. त्या अनुषंगाने विचार केले तर भाजपनेही विचार करू अशी भूमिका घेतल्याने आघाडीच्याही भुवया उंचविल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. सुधीर तांबे यांच्या आणि सत्यजित यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील काँगेस अडचणीत आली असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात गप्प का? कुठे आहेत बाळासाहेब थोरात? या बंडामागे थोरात यांचा छुपा पाठींबा आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

First published:

Tags: Balasaheb thorat, Nashik, Satyajit tambe