धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 23 मार्च : आपली संपूर्ण पृथ्वी ही विविध आश्चर्याने भरलेली आहे. संपूर्ण जगात अनेकदा आपल्याला अशा काही गोष्टी माहित पडतात की ज्यावर विश्वास ठेवणे अशक्य वाटते. तसेच अनेक अशा प्राचीन विद्या देखील असतात ज्या अशक्य गोष्टीला शक्य आणि शक्य गोष्टीला अशक्य बनवतात. अशीच एक विद्या अस्तित्वात आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ या विषयी माहिती मिळवू शकता किंवा एक प्रकारे तर्क लावू शकता. ती विद्या म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग होय. काय आहे इतिहास? वैभव पवार गेल्या बारा वर्षांपासून टॅरो कार्ड विद्या या क्षेत्रात काम करतात. वैभव पवार हे भारतात पहिले आहेत ज्यांनी भारतात टॅरो कार्ड विद्या सुरू केली असा दावा ते करतात. पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वी जिप्सी समाज टॅरो कार्ड वापरत असे. हे कार्ड जिथून आले आहेत तिथून ही विद्या सुरू झाली आहे. पूर्वीच्या काळी कागदपत्र नव्हती. त्याकाळी गुहांमध्ये काही चित्र काढून ते वाचले जात असे. मात्र 1900 च्या दशकात पमिला पॉलमिन मिथस् गुहांमध्ये काही चित्र सापडले होते. त्यानंतर तिने अशी एक डेक बनवली. त्या डेकमध्ये 78 कार्ड समाविष्ट करण्यात आले. आणि तेव्हापासून टॅरो कार्ड ही प्रथा सुरू झाली, असं टॅरो कार्ड रीडर वैभव पवार सांगतात.
टॅरो कार्ड म्हणजे काय? टॅरो कार्ड म्हणजे 78 पत्त्यांचा एक समूह असतो, ज्याचे मुख्यतः दोन भागात विभाजन केले जाते. या दोन गटात 22 आणि 56 याप्रमाणे पत्त्यांचा समूह असतो. या पत्त्यांचा उपयोग अगदी अनेक वर्षांपासून भविष्यवाणी करण्यासाठी होत आला आहे. या प्रत्येकद्वारे आपण आपल्या कौटुंबिक जीवनाची, विवाहित जीवनाची, आपल्या जीवन-मरणाचे आणि अधिक विविध प्रकारची माहिती जाणून घेऊ शकतो. ज्या प्रमाणे भारतात ज्योतिष विद्येचा वापर करून आणि आपल्या हातावरील रेषा व आपली राशी जाणून घेऊन आपले भविष्य सांगतो. हे टॅरो कार्ड देखील अगदी काही प्रमाणात असेच आहे. टॅरो पत्त्यांचा समूह तुमच्यासमोर ठेवला जातो आणि त्यातील तुम्हाला केवळ तीन पत्त्याची निवड करायची असते. निवडलेले हे तीन कार्डच तुमच्या भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळाची माहिती दर्शवित असतात.
Nashik News : 6 वर्षांची चिमुरडी गाते तब्बल 15 भाषांमध्ये गाणी! पाहा भन्नाट Video
कार्ड उचलण्याची एक पद्धत हे कार्ड उचलण्याची एक पद्धत आहे. हे कार्ड तुम्हाला तुमच्या डाव्या हाताने उचलावे लागतात. कारण डावा हात तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. तसेच तुमच्यामध्ये दोन प्रकारचे विचार असतात एक म्हणजे कॉन्शियस आणि दुसरं म्हणजे सबकॉन्शियस म्हणून हे एकच असं विज्ञान आहे जे बारा महिन्यांसाठी सांगितलं जातं, असंही वैभव पवार यांनी सांगितले.

)







