Home /News /mumbai /

सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी कुठली गोष्ट टाळायला सांगितली होती? जाणून घ्या सविस्तर

सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी कुठली गोष्ट टाळायला सांगितली होती? जाणून घ्या सविस्तर

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. जाणून घेऊया सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी 20 तास नेमकं काय घडलं.

  मुंबई, 2 सप्टेंबर : प्रसिद्ध अभिनेता (Actor) आणि ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Siddharth Shukla) गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं (Heart attack) निधन (Death) झालं. अवघ्या चाळीसाव्या वर्षी (Age of 40) त्याचं निधन झाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. जाणून घेऊया बुधवार दुपारपासून त्याच्या मृत्यूपर्यंत नेमकं काय काय घडलं.
  • सिद्धार्थ शुक्ला बुधवारी दुपारी एका नव्या प्रोजेक्टबाबत मीटिंग करण्यासाठी गेला होता.
  • सात्री साडेआठ वाजता तो घरी परत आला
  • त्यानंतर रात्री साडेदहा वाजेपर्यंत त्याने बिल्डिंगच्या आवारातच जॉगिंग केलं आणि परत येऊन थोडी विश्रांती घेतली.
  • रात्री काहीतरी खाऊन तो झोपी गेला
  • आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं यावेळी सिद्धार्थनं शेहनाजला सांगितलं. शेहनाजचं हेच त्याच्या आईला सांगितलं.
  • त्याच्या आईनं रात्री 1 वाजता त्याला ज्यूस आणि पाणी दिलं आणि शांतपणे झोपायला सांगितलं.
  • पहाटे तीन वाजता त्याची आई मेडिटेशनसाठी उठली. सिद्धार्थ शांतपणे झोपला असल्याचं पाहून ती मेडिटेशनसाठी दुसऱ्या खोलीत निघून गेली.
  • मेडिटेशन संपवून परत आल्यावर पाहिलं, तर सिद्धार्थ अगदी तसाच झोपला होता, जसा तो मेडिटेशनला जाण्यापूर्वी झोपला होता. त्याने काहीच हालचाल केली नव्हती, कूस बदलली नव्हती किंवा हातपाय देखील हलवला नव्हता.
  • पहाटे पाच वाजता आईनं सिद्धार्थच्या बहिणींना फोन केला, ज्या त्याच इमारतीत राहतात
  • सिद्धार्थच्या बहिणींनी हा प्रकार पाहून डॉक्टरांना फोन केला आणि बोलावून घेतलं.
  • सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान डॉक्टर धरमपाल घरी पोहोचले. त्यांनी सिद्धार्थची अवस्था पाहून त्याला तातडीने कूपर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
  • सकाळी साडेआठ वाजता अँब्युलन्स आली आणि सिद्धार्थला कूपर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.
  • 9 वाजून 25 मिनिटांनी सिद्धार्थचे कुटुंबीयदेखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले
  • सुमारे साडेदहा वाजता त्याला मृत घोषित करण्यात आलं.
  • फॅमिली डॉक्टरांनी सिद्धार्थला जास्त व्यायाम न करण्याचा सल्ला दिला होता.
  • सिद्धार्थ रोज 3 ते 4 तास व्यायाम करत असे
  सिद्धार्थच्या अचानक जाण्यामुळे अख्ख्या मनोरंजन विश्वाला हादरा बसला आहे.
  Published by:desk news
  First published:

  Tags: Death, Siddharth shukla

  पुढील बातम्या