मुंबई, 8 एप्रिल : सचिन वाझे प्रकरण असो वा राज्यातील कोरोनाची परिस्थिती भाजपकडून राज्य सरकारवर वारंवार ताशेरे ओढले जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत विविध कारणांनी ठाकरे सरकारवर टीका केली. यावर ठाकरे सरकारमध्ये प्रमुख मंत्री राजेश टोपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
जावडेकर यांनी ट्वीट करीत महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करू नये असा टोला लगावला आहे आणि राज्य सरकारला केंद्राने किती लशी पुरवल्या याचा आकडा सांगितला आहे. यावरही आरोग्य मंत्री राजेश टोेपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावर ते म्हणाले की, लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.
लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये.याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. https://t.co/8ewkNm216D
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 8, 2021
प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे खरं तर महावसुली सरकार
हे मागच्या दाराने आलेलं सरकार आहे
सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा
पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला
आम्ही जगातील सर्व काही पाहिलं पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे प्रथमच पाहिलं
ज्या व्यक्तीची गाडी होती त्याची हत्या करण्यात आली
दरम्यान परमबीर सिंग यांचे पत्र समोर येतं
सचिन वाझे आणि शिवसेनेचे नाते काय? प्रकाश जावडेकरांनी उपस्थित केला प्रश्न
पोलिसांकडून वसुली करा, लूट करा आणि वाटून घ्या... म्हणूनच तिन्ही पक्ष एकत्र आहेत
महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम आहे तरी काय?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.