मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /VIDEO : कोकणातील पुरग्रस्तांबद्दल 'तो' प्रश्न विचारताच ऊर्जा मंत्र्यांचा चक्क पत्रकार परिषदेतून काढता पाय

VIDEO : कोकणातील पुरग्रस्तांबद्दल 'तो' प्रश्न विचारताच ऊर्जा मंत्र्यांचा चक्क पत्रकार परिषदेतून काढता पाय

या घटनेचा एक VIDEO समोर आला आहे. यावर नागरिक राग व्यक्त करीत आहेत.

या घटनेचा एक VIDEO समोर आला आहे. यावर नागरिक राग व्यक्त करीत आहेत.

या घटनेचा एक VIDEO समोर आला आहे. यावर नागरिक राग व्यक्त करीत आहेत.

चिपळूण, 29 जुलै: गेला आठवडा हा कोकणवासियांसाठी आव्हानात्मक ठरला आहे. आधी निसर्ग त्यानंतर तौत्के आणि आता पावसाचा कहर असल्यामुळे अनेकांचं घरदार उद्ध्वस्त झालं आहे. पूर ओसरेल मात्र डोळ्यातील आसवं कधी ओसरणार असा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्र्यांनी कोकणाचा दौरा केला. यावेळी अनेक आश्वासनंही देण्यात आली. मात्र फक्त आश्वासनांवर पोट भरत नाही, अशी विनंती कोकणातील नागरिकांकडून केली जात आहे. (Energy Minister Nitin Raut left press conference)

दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत हेदेखील चिपळून दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र पत्रकारांनी हा प्रश्न विचारताच मंत्र्यांनी काढता पाय घेतला. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी चक्क पत्रकार परिषद मध्येच आटोपून निघून गेले. चिपळूणच्या दौऱ्यावर आलेल्या नितीन राऊत यांना पत्रकारांनी पूरग्रस्तांना विजबिलात सूट देणार का ? (Electricity bill discount) असा प्रश्न केला. या प्रश्नानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला. खरं तर विजबिलाच्या प्रश्नावर ऊर्जामंत्री नितीन राऊत गोंधळले. त्यामुळे प्रश्नाला उत्तर न देता नितीन राऊत यांनी काढता पाय घेणंच पसंत केलं. नितीन राऊत चिपळूणच्या पूरपरिस्थितीचा आढावा आणि पुरामुळे महावितरणच झालेलं नुकसान याच्या पाहणीसाठी चिपळूण येथे आले होते.

हे ही वाचा-पूरग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी, विजय वडेट्टीवारांनी दिली मोठी माहिती

दरम्यान वडेट्टीवारांनी पुरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्यापासूनच पूरग्रस्तांच्या थेट खा

First published:
top videos

    Tags: Nitin raut, State Electricity