Home /News /mumbai /

केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल, प्रसाद लाड यांनी दिली महत्त्वाची माहिती

केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल, प्रसाद लाड यांनी दिली महत्त्वाची माहिती

Narayan Rane In Lilavati Hospital: नारायण राणे (Narayan Rane) मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

    मुंबई, 26 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल झाले आहेत. रुटीन चेकअपसाठी (Routine Check Up)राणे रुग्णालयात गेल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात वादळ उठलं होतं. याच दरम्यान राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. ती लवकरच पुन्हा सुरु आहे. उद्या जन आशीर्वाद सिंधुदुर्गात असेल. याच पार्श्वभूमीवर रुटीन चेकअपसाठी नारायण राणे रुग्णालयात पोहोचले. नारायण राणे यांना रुग्णालयात अॅडमिट केलेलं नाही. राज्यभरात होणाऱ्या या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी हे रुटीन चेकअप करण्यात येत असल्याची माहिती भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. ''काबूल विमानतळाजवळ जाऊ नका'', अमेरिकेचा नागरिकांना इशारा उद्या जन आशीर्वाद यात्रा नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणार आहे. सिंधुदुर्ग राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालं आहे. राणे-सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसलीय.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Narayan rane

    पुढील बातम्या