24 जुलै : ‘सामना’तल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा दिवस आहे. आजही त्यांनी भाजपवर टीका केली. शिवसेनेसोबत संबंध का बिघडले याचा विचार भाजपनं करावा. तुटलेले संबंध जोडण्यासाठी भाजपनं पुढाकार घेतला पाहिजे. भाजपच्या वागण्यात काही सुधारणा झाली तरच वेगळा विचार होऊ शकतो. नाही तर शिवसेनेनं ‘एकला चलोरे’चा मार्ग स्वीकारलेलाच आहे, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं. या प्रश्नावर शिवसेनेनं यु टर्न घेतलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. टोकाचं भांडण होऊनही भाजपसोबत आम्ही सत्तेत आहोत ते केवळ महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठीच मी कमीपणा घेतला असं समजा असं सांगत उद्धव यांनी शिवसेनेचे नाराजी उघड केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.