धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 28 मार्च : द ट्रान्स कॅफे या आगळ्यावेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कॅफेची सुरुवात मुंबईच्या अंधेरी चार बंगला परिसरात गेल्या वर्षी झाली होती. आता मुंबईत प्रभादेवी येथील रचना संसद कॉलेजच्या जवळ तृतीयपंथीयांकडून चालवले जाणारे पहिले ट्रान्सफॉर्मेशन सलून सुरू करण्यात आले आहे. तृतीयपंथी समूहासाठी हे सर्वात मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
काय आहे वैशिष्टय?
मुंबईतील हे सलून 7 तृतीयपंथी व्यक्ती चालवतात. या अनोख्या सलूनच्या मालक जैनब पटेल स्वत: ट्रान्सजेंडर समुदायातील आहे. या सलूनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांना प्रशिक्षण तसेच रोजगार देण्यात आला आहे. त्याचबरोबर डॉइश बँक आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या सहकार्याने हे सलून सुरू करण्यात आले. प्रभादेवी येथील रचना संसद कॉलेजच्या जवळ हे सलून आहे. या सलूनमध्ये अत्यंत उच्च प्रतीचे प्रशिक्षण घेतलेले ब्युटीशीयन कार्यरत आहे. त्यापैकी काही कर्मचारी तृतीयपंथी/एलजीबीटीक्यू आहेत.
...म्हणन सुरु केले सलून
ज्यावेळी लोक तृतीयपंथी समाजातील लोकांना सिग्नल लग्न समारंभ अशा ठिकाणी भेटतात आणि सल्ला देतात की तुम्ही दुसरे काम का करत नाही. मात्र, आजपर्यंत कोणी आम्हाला सुचवलं नाही की आम्ही दुसरं काय करावे. आम्ही ठरवलं की आम्हाला स्वाभिमानाची नोकरी हवी आहे भीक मागून यापुढे जगायचं नाही. अभिमानाने जगायचं आहे. दोन पैसे स्वाभिमानाचे भेटतील ज्या ठिकाणी आम्हाला मान असेल अशा ठिकाणी काम करायचा आहे. हीच संकल्पना लक्षात घेऊन आम्ही ट्रान्सफॉर्मेशन सलूनची सुरुवात केली. तृतीयपंथीयाकडून चालविले जाणारे हे मुंबईतील पहिले सलून आहे. या पुर्वी अंधेरीत संपूर्णतः तृतीयपंथीयांनी चालविलेला एक कॅफे सुरु केल्यानंतर मुंबईतला हा दुसरा संयुक्त उपक्रम आहे, असं जैनब पटेल यांनी सांगितले.
आम्हाला फार आनंद
येथे काम करणारी कर्मचारी शामली पुजारी सांगते की, चित्रपटांमधील अभिनेते अभिनेत्रींना पाहायचे तेव्हा त्यांचा गेटअप पाहायचे. त्यावेळी मला असं वाटायचं की मी पार्लर क्षेत्रात किंवा चित्रपट सृष्टीमध्ये मला संधी भेटली पाहिजे आणि या संधीचा मी नक्कीच सोन करेन असं सारखं वाटत होतं. त्यानंतर या क्षेत्रासंदर्भातील मेकअप आर्टिस्ट, नेल आर्टिस्ट, असे विविध प्रशिक्षण मी घेतलं.
The Trans Cafe : मुंबईत तृतीयपंथीयांनी सुरू केले हॉटेल, पाहा काय आहे खासियत Video
प्रशिक्षण घेतल्यानंतर विविध जनरल सलूनमध्ये काम करण्यासाठी अर्ज केला असता तिला तिथे नाकारण्यात आले. कारण म्हणजे ती एक तृतीयपंथी आहे. अशा बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. पण आज तृतीयपंथीयासाठी सलून उघडलं गेले आहे आणि त्यात आम्ही आज काम करतोय याचा आम्हाला फार आनंद असल्याचे शामली सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.