उन्हाच्या काहीलीनं वन्यप्राणीही त्रस्त, पिंजऱ्यात लावले थर्मामीटर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2017 10:13 PM IST

उन्हाच्या काहीलीनं वन्यप्राणीही त्रस्त,  पिंजऱ्यात लावले थर्मामीटर

उदय जाधव, मुंबई

17 एप्रिल : राज्यात उष्णं लाटेमुळे सर्वसामान्य जसे हैराण झालेत, तसेच वन्यजीव देखील त्रस्तं झालेत. मुंबईतील काँक्रीटच्या जंगलातील झळा, आता नॅशनल पार्कच्या जंगलातील प्राण्यांनाही जाणवू लागल्यात. त्यामुळे वन विभागाने प्राण्यांच्या संरक्षणासाठी थर्मामीटर, पंखे, पाणवठे अशा सुविधा उपलब्ध केल्यात.

उन्हाच्या काहिलीत थंड पाण्याचा शिडकावा सगळ्यांनाच हवा हवासा वाटतो. नॅशनल पार्कमधील वाघोबाही सध्या दुपारच्या रणरणत्या उन्हात, असाच गारवा अनुभवतायेत. पिंजऱ्यातील वातावरण थंड रहावं यासाठी वन विभागानं पंखे तर लावले आहेतच, त्याचबरोबर आता पिंजऱ्यात थर्मामीटरही लावले आहेत.

उन्हाळयात नॅशनल पार्कमध्ये पिंजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांसाठी जसं नियोजन वन विभागानं केलं आहे. तसंच जंगलातील प्राण्यांसाठी देखील केल्याचं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सध्याच्या कडक उष्ण लाटेपासून वाचण्यासाठी आपण विविध उपाययोजना करतो. पण प्राणी आणि पक्षांना शहरात पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध होत नाही. त्यासाठी आपल्याला जमेल तसं प्रयत्न करणं आवश्यक आहे. तेही चांगल्या पर्यावरणासाठी...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 10:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...