विवेक कुलकर्णी, मुंबई 24 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर आलाय. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिलाय. त्यामुळे बहुमतासाठी त्यांना जे संख्याबळ जमवायचं आहे त्याची जबाबदारी भाजपने काही दिग्गज नेत्यांवर सोपवली आहे. ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करण्यासाठी हे चारही नेते कामाला लागले असून विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप आता निर्णायक लढाई लढत आहे. बहुमत जमवणं हे भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेचं झालं असून त्यासाठी काहीही करण्याची तयारी या नेत्यांनी केलीय. त्यातच मी अजुनही राष्ट्रवादीतच असून शरद पवार हेच माझे नेते आहेत असं ट्विट अजित पवारांनी केल्याने पुन्हा एकदा संभ्रम वाढला असून शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची चिंता वाढली आहे.
शरद पवारांच्या विश्वासू माणसानेच दिलं अजित पवारांना आमदारांचं समर्थनाचं पत्र
भाजपने ज्यांच्यावर ही जबाबदारी टाकली ते सर्व नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. हे दिग्गज नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, बबनराव पाचपुते आणि नारायण राणे या चारही नेत्यांचं काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी आणि नेत्यांशी चांगली ओळख आहे त्याचबरोबर त्यांना संसदीय राजकारणाचाही दिर्घकाळ अनुभव आहे. त्यामुळे भाजपने ही जबाबदारी त्यांना सोपविल्याचं मानलं जातंय. विखे पाटील हे काँग्रेसमधून, गणेश नाईक आणि पाचपुते हे राष्ट्रवादीतून तर नारायण राणे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. अजित पवार म्हणतात शरद पवार हेच माझे नेते राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असून शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत, असं स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांची विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी मांडलेली भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अजित पवारांनी मानले PM मोदींचे आभार, दिला ‘हा’ विश्वास
‘काळजी करण्याचं कारण नाही. सगळं काही ठिक आहे. फक्त थोड्या संयमाची गरज आहे. तुमच्या पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच मी राष्ट्रवादीत असून यापुढेही कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे. शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी युती महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देऊ. हे सरकार राज्याच्या विकासाठी कटिबद्ध असेल,’ असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

)







