उदय जाधव आणि रफिक मुल्ला, मुंबई 13 जुलै : मुंबईतली एसआरए योजना ही नेते, अधिकाऱ्यांचं भ्रष्टाचाराचं कुरण असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पण एक कोटी रूपयांचा व्यवहार झालेला दाखवूनही अजून तरी कुणालाही ना अटक झालीय ना चौकशी होतेय. घाटकोपरच्या हनुमान नगरच्या लोकांना बिल्डर, नेते, सरकार आणि संदीप येवलेंबाबत नेमकं काय वाटतं त्याचा हा पुरावा. आरोप असलेले ओंकार बिल्डर ना लोकांपर्यंत पोहोचतायत ना स्थानिक लोकप्रतिनिधी यात कुठली भूमिका घेतायत असा आरोप लोकांचा आहे. एवढंच नाही तर 95 पासून सरकारची भूमिका कशी आहे यावरही लोकांची नाराजी आहे. mx. 40 लाखांची बंडलं त्यांनी माध्यमांसमोर मांडलीयत. पण नोटाबंदीत जिथं लोकांना पाचशे रूपयांची नोट एटीएममधून मिळत नाहीय तिथं एखाद्या बिल्डरकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेली कॅश वैद्य आहे काय? संदीप येवलेंनी 60 लाख रूपये नेमके कुठं खर्च केलेत? राहीलेल्या 40 लाखांची एसीबी, ईडीकडून काही चौकशी होईल का? एवढी कॅश एकदाच देणाऱ्या बँकेची चौकशी होईल का? विश्वास पाटलांसारख्या तत्कालिन अधिकाऱ्याची चौकशी होणार का? हे आणि असे अनेक प्रश्न अजून तरी अनुत्तरीतच आहेत. दरम्यान संदीप येवले यांनी केलेले सगळे आरोप ओंकार डेव्हलपर्सचे डायरेक्टर कौशिक मोरे यांनी फेटाळून लावलेत. संदीप येवले केलेले आरोप फेटाळून लावताना त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.