ठाणे, 04 मार्च : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या उंभ्रई गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अज्ञात माथेफिरूने जनावरांच्या गोठ्याला आग लावल्याने तीन जनावर भाजली आहेत तर एक वासरू होरपळून मेल्याची घटना समोर आली आहे. पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या जनावरांचा असा अंत झाल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या उंभ्रई येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला रात्रीच्या वेळी आग लागली. याआगीमध्ये एकूण तीन जनावरे भाजली तर एका वासराचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील उंभ्रई येथी सखाराम नामदेव चौधरी या शेतकऱ्यांच्या गोठ्याला काही समाज कंठकानी रात्रीच्या सुमारास आग लावली असल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये एका लहान वासराचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. तर एक गाय व एक बैल हे भाजले आहेत.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पूर्ण परिसरात निषेध व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी किन्हवली पोलीस पोहचले असून सदर घटनेचा तपास करत आहेत.
24 तासांत शहापूर तालुक्यात 2 मोठ्या घटना
दिसायला काळी असल्यामुळे एका महिलेचा तिच्या पतीनं गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फरझाना बेगम (वय 28) असं मृत महिलेचं नाव असून, या प्रकरणी तिचा पती आरोपी खाजा पटेल विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. घटनेनंतर आरोपी आणि त्याचे कुटुंबीय फरार आहेत. बुधवार (1 मार्च 2023) रोजी ही घटना कर्नाटक राज्यातील जेवारगी तालुक्यातील केल्लूर गावात घडली.
‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने याबाबत वृत्त दिलंय.पीडित महिला ही यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील रहिवासी होती. तिच्या मृत्युची माहिती मिळताच माहेरच्या लोकांनी आरोपी खाजा पटेल यांच्या विरोधात जेवरगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच कलबुर्गी येथील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनानंतर शहापूर येथे पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाडव्यापूर्वीच ठाणेकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं गिफ्ट; लाखो लोकांना होणार फायदायाबाबत, कलबुर्गी ग्रामीण पोलीस उपअधीक्षक उमेश चिकमठ यांनी सांगितलं की, ‘या प्रकरणी हुंडाबळी मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. तसंच आरोपींचा शोधही घेतला जातोय.’