Home /News /mumbai /

धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा

धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा

रेल्वेवर दगड मारणं समाजकंटकांना पडणार महागात

27 मे : मुंबईकरांची लाइफलाइन अशी ओळख असणाऱ्या रेल्वे लोकलमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवासादरम्यान धावत्या ट्रेनवर दगड भिरकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या दगड फेकीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आता या दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना हे कृत्य चांगलेच महागात पडणार आहे. कारण, या पुढे धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणाऱ्याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असं पश्चिम रेल्वेने स्पष्ट केलं आहे. रेल्वे प्रशासनानं दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर यापुढे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवले जातील असं म्हटलं आहे. झोपड्यांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड फेकतात. गेल्या काही महिन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडल्याचे समोर आले असून यात अनेक जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे  पश्चिम रेल्वेकडू हा निर्णय घेण्यात आला आहे.
First published:

Tags: Punishable

पुढील बातम्या