सिंधुदुर्ग, 10 जुलै : सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. (Rain in Maharashtra) या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. पावसामुळे निर्सगाचे सौंदर्य खुलले आहे. (Nature in Rain) यामुळे अनेक जण पर्यटनालाही प्राधान्य देत आहेत. मात्र, पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या आंबोली धबधबा (Amboli Rainfall) हुल्लड बाजांमुळे बदनाम होत आहे. (Youngsters at Amboli Raifall) नेमकं काय झालं - पावसाळ्यात विविध धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होते. याचप्रमाणे सिंधुदुर्गाच्या आंबोली धबधबा येथे पर्यटकांनी भेट दिली. त्यात आज रविवार असल्याने धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या आंबोली धबधबा हुल्लडबजामुळे बदनाम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र, याच कोंडीत दुचाकीवरून हुल्लडबाजी करणारे चांगलेच आपटले. तर एका तरुणांच्या गटाने भर रस्त्यात डान्स करत पर्यटकांना वेठीस धरले. सिंधुदुर्ग पोलिसांनी वेळीच अशांना रोखण्याची गरज व्यक्त होत आहे.
सिंधुदूर्ग : पावसाळी पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या आंबोली धबधबा येथे तरुणांच्या हुल्लडबजामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. pic.twitter.com/4GhEub7S5E
— News18Lokmat (@News18lokmat) July 10, 2022
हेही वाचा - वर्ध्यात वीज कोसळल्याने तब्बल 24 मेंढ्या ठार, जिल्ह्यात खळबळ
महाराष्ट्रात पावसाचा कहर! 24 तासांत 9 जणांचा मृत्यू -
राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सूनच्या पावसाने (Monsoon rain update) आता आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अजूनही सर्वदूर पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी होतोय, तिथं परिस्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत.