News18 Lokmat

'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार

भायखळ्यात नायजेरीयन ड्रग्स माफिया हे ड्रग्स विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली होती

News18 Lokmat | Updated On: Dec 15, 2018 08:45 PM IST

'शूट आउट अॅट भायखळा', नायजेरियन ड्रग्स माफियांचा पोलिसांवर गोळीबार

विवेक गुप्ता, प्रतिनिधी

मुंबई, 15 डिसेंबर : मुंबईतील भायखळ्यामध्ये पोलीस आणि नायजेरियन ड्रग्ज माफियांमध्ये मोठी चकमक उडाली. नायजेरियन माफियांचा पाठलाग करत असताना या माफियांनी पोलिसांवर गोळीबार केला.

भायखळ्यात नायजेरियन ड्रग्स माफिया हे ड्रग्स विकण्यासाठी आल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी झोन क्रमांक तिनेमध्ये दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाच ते सात नायजेरियन तरुणाची टोळीला पाहिलं. जेव्हा पोलिसांनी या टोळक्याची तपासणी सुरू केली असता. त्यांनी पळ काढला आणि पोलिसांवर रिव्हालवरमधून गोळीबार केला. पोलिसांनीही प्रतिउत्तर दाखल नायजेरियन टोळीवर गोळीबार करून जेरबंद केलं.

या टोळीकडून 20 लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आलं आहे. तसंच एक रिव्हालवर आणि 4 जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले. पोलिसांनी 7 नायजेरीयन तरुणांना अटक केली आहे. नायजेरियनकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 3 ते 4 पोलीस जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या टोळीच्या विरोधात अवैधशस्त्र आणि अमली पदार्थ वापरण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भायखळा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Loading...

=========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2018 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...