मुंबई, 19 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackray memorial) स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं होतं. शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र (Cow urine) शिंपडत या जागेचं शुद्धीकरण केल्याचं सांगितलं आहे. नारायण राणेंनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळापाशी येऊ नये, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत राणेंनी शिवाजी पार्कपासून त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackray memorial) स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं होतं. शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र (Cow urine) शिंपडत या जागेचं शुद्धीकरण केलं. pic.twitter.com/8Ju8X6Haua
— News18Lokmat (@News18lokmat) August 19, 2021
राणे विरुद्ध शिवसेना
मुंबईत शिवसेनेची सत्ता उलथून टाकून यावेळी भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला. त्यापूर्वी त्यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. यावरून शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना होती. शिवसेनाप्रमुखांना धोका देणाऱ्या राणेंना शिवतीर्थावर प्रवेश देणार नसल्याची भूमिका शिवसेनेनं घेतली होती. नारायण राणेंच्या शिवाजी पार्क भेटीनंतर आता शिवसैनिकांनी त्या परिसरात गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करत असल्याचं सांगत भाजपला एकप्रकारे खिजवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपची टीका
शिवसेनेच्या या कृतीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी कडाडून टीका केली आहे. सत्तेसाठी सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेतलेले आणि बाळासाहेबांना अटक कऱणारे छगन भुजबळ जर शिवसेनेला चालत असतील, तर त्यांनी शुद्धीकरणाचे नाटक करू नये, अशी टीका शेलार यांनी केली आहे. हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असून सत्तेसाठी तत्त्वांना पायदळी तुडवणाऱ्या शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकीत जनताच धडा शिकवेल, असा टोला लगावला आहे.
हे वाचा -पोलीस ठाण्यातच आरोपीची गळफास घेत आत्महत्या
संघर्षाची नांदी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. तर राणेंच्या भेटीनंतर स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करत शिवसेनेनंही भाजपला खिजवण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात हे प्रकार वाढत जाणार असून मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत वातावरण तापत राहणार असल्याचा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Narayan rane, Shivaji park, Shivseana