'...तेव्हा शरद पवार योद्ध्यासारखे उभे राहिले', संजय राऊतांची तुफान फटकेबाजी

संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर भाष्य केलं आहे.

  • Share this:
ठाणे, 7 जुलै : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दीर्घ मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत येत्या शनिवारपासून 3 भागांमध्ये प्रसारित होणार आहे. याच मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर भाष्य केलं आहे. 'पहाटे शपथविधी झाला तेव्हा अनेकांनी पवारांना आरोपाच्या पिंजऱ्यात ठेवले होते. पण तेव्हा हे शरद पवार योद्ध्यासारखे उभे राहिले. लॉकडाऊन, डेडलॉक तोडून त्यांनी सरकार स्थापन केले,' अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी पवारांची स्तुती केली आहे. 'ही खिचड़ी नाही, हे सरकार तीन पक्षांनी येत तयार केलं आहे. ते पाच वर्षे टिकेल. सत्ता स्थापन प्रक्रियेविषयी शरद पवारांची खुली मुलाखत घ्यायची होती, पण काही कारणानं ती मागे पडली. पवार साहेबांच्या खासगी मुलाखती शेकडो घेतल्यात, पण खुली मुलाखत आता घेत आहे. अन्य राजकीय नेत्यांच्याही मुलाखती घेणार आहे,' असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेतील ठळक मुद्दे : - मी पाहत असलेले शरद पवार वेगळे आहेत - सरकारमध्ये अंतर्विरोध काय आंतरपाटसुद्धा नाहीत - मुख्यमंत्री राज्य चालवताना कधीच अंधारात नसतात - बदल्यांचे राजकारण करू नये - पारनेरविषयी दोन्ही पक्षांत चर्चा झाली. तो स्थानिक प्रश्न आहे, आता ही चर्चा नको. - कोरोनामुळं संवांद कमी झाला, मतभेद नाहीत - लोकशाही आहे, खटके उडणं हे जीवंतपणाचे लक्षण आहे - अशी मुलाखत होणे नाही, तीन भागात मुलाखत आहे. सर्व विषयांवर पवार साहेब दिलखुलास बोललेत. देशात त्यांच्या उंचीएवढा नेता नाही - मुख्यमंत्र्यांचीही त्यांच्या वाढदिवसाला मुलाखत घेणारा आहे.
Published by:Akshay Shitole
First published: