अच्छे दिनचा रोज खून होतो आहे-सेनेची केंद्र सरकारवर टीका

बुलेट ट्रेनचा तीस-चाळीस हजार कोटींचा भुर्दंड महागाई कमी करण्यासाठी वापरला असता तर बरं झालं असतं, अशी खरमरीत टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2017 09:44 AM IST

अच्छे दिनचा रोज खून होतो आहे-सेनेची केंद्र सरकारवर टीका

मुंबई,18 सप्टेंबर: सामनातून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. अच्छे दिनचा रोज खून होत असून बुलेट ट्रेनचा तीस-चाळीस हजार कोटींचा भुर्दंड महागाई कमी करण्यासाठी वापरला असता तर बरं झालं असतं, अशी खरमरीत टीका सामनामध्ये करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात व देशात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याचं एक प्रमुख कारण पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ असं विधान सामनामध्ये करण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षातच फक्त गुणवत्ता म्हणजे मेरिटचा महापूर अशीही टीका करण्यात आली आहे. 'गरीबांचा इतका अपमान काँगेस राजवटीतही झाला नव्हता. काँगेस राज्यात इंधन दरवाढ झाली तेव्हा आज मंत्री असलेल्या राजनाथ सिंहांपासून सुषमा स्वराजपर्यंत आणि स्मृती इराणींपासून धर्मेंद्र प्रधानांपर्यंत सर्व भाजप नेते रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत होते'.असंही सामनात म्हटलं आहे.

'काँगेसच्या मंत्र्यांनी असं एखादं बेलगाम व जनतेशी बेइमानी करणारं विधान केलं असतं तर आजच्या भाजप सरकारी सोंगाड्यांनी सोशल मीडियावर मुखवटे लावून नाचकाम केलं असतं, पण आज हे सोंगाडे तोंडात कसल्या गुळण्या घेऊन बसले आहेत?' असा सवाल सामनातून सेनेने विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 09:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...