Home /News /mumbai /

'शेजारील राष्ट्रांतील आपल्या भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचला' शिवसेनेची मोदी-शहांकडे विनंती

'शेजारील राष्ट्रांतील आपल्या भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचला' शिवसेनेची मोदी-शहांकडे विनंती

मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान हा एक मजबूत देश बनला आहे, असा दावा भाजपातील कडवट मोदीभक्त नेहमीच करत असतात त्यात काहीच चुकीचे नाही असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांत भारताच्या (India) शेजारील राष्ट्रांत (neighboring countries) हिंदू किंवा शीख बांधवांवर हल्ले (Attack on Hindu, Shikh) वाढत असल्याच्या घटना समोर येत आहेत यावरुन शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामानातून (Saamana) भाष्य करताना केंद्राकडे खास विनंती केली आहे. सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे, पाकिस्तान, बांगलादेशातील हिंदू यातना भोगीत असतानाच बाजूच्या अफगाणिस्तानातही तालिबान्यांनी हिंदू व शीख समाजावर निर्घृण हल्ले सुरू केले आहेत. मंदिरे, गुरुद्वारात घुसून विध्वंस केला जात आहे. याची फक्त दखल घेऊन किंवा निषेध करुनच भागणार नाही तर शेजारील राष्ट्रांतील हिंदू-शिखांना आधार वाटेल असा एखादा दणका देणे गरजेचे आहे. ही नम्र विनंती या राष्ट्रांतले हिंदू परंपरेने, पिढ्यानपिढ्या तेथे राहत आहेत. ते नागरिक आक्रमक नाहीयेत आणि अतिरेकी नाहीयेत. त्यांच्या मागण्याही नाहीत पण शेजारच्या तिन्ही राष्ट्रांतील धर्मांध अतिरेकी त्यांना समूळ खतम करु पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री शह यांनी हिंदूंची ही पिछेहाट आणि दुर्दशा थांबवावी. आपल्या मजबूत इराद्यांची जगभरात चर्चा आहे. म्हणूनच शेजारच्या राष्ट्रांतील आपल्या भाईबंदांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलावीत अशी विनंतीही सामनातून पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल 10000 रुपयांचा दंड त्यांच्याकडे रक्ताची माणसे म्हणून पहायला हवे मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान हा एक मजबूत देश बनला आहे, असा दावा भाजपातील कडवट मोदीभक्त नेहमीच करत असतात त्यात काहीच चुकीचे नाही. मोदी यांच्या शक्तिमान प्रतिमेमुळे तसेच गृहमंत्री शहा यांच्या बाहुबली कार्यपद्धतीमुळे देशातील व देशाबाहेरील अतिरेकी प्रवृत्ती भारताला घाबरून असल्याचे सांगितले जाते पण गेल्या काही दिवसांत शेजारील राष्ट्रांत तसेच जम्मू-काश्मीर खोऱ्यात हिंदू आणि शिखांवरील हल्ले वाढले आहेत. त्यांच्याकडे फक्त हिंदू किंवा शीख म्हणून न पाहता आपल्या रक्ताची माणसे म्हणून पाहायला हवे. काश्मीरात अतिरेकी कारवायांनी पुन्हा फणा काढला आहे. भाजपच्या एका सरपंच आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. अनंतनागमधील घरात घुसून गुलाम रसुल दार आणि पत्नी जव्हारा बेगम यांना ठार करण्यात आले. हे दोघेही राष्ट्रवादी मुस्लिम होते आणि त्यांच्या घरावर तिरंगा फडकत होता. गेल्या काही महिन्यांपासून खोऱ्यात भाजपसंबंधित लोकांवर हल्ले वाढले आहेत. ही चिंतेची बाब आहे. काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांचा हा वावर वाढला असेल तर गुप्तचर यंत्रणा काय करतात? असा सलवालही सामनातून विचारण्यात आला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Amit Shah, Narendra modi, Shiv sena

    पुढील बातम्या