मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार' शिवसेनेचा घणाघात

'गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार' शिवसेनेचा घणाघात

Saamana editorial: काँग्रेसने सर्वाधिक 17 आमदार जिंकनही सत्ता स्थापनेच्या दाव्यास उशीर केला. या काळात भाजपने फोडाफोड करुन बहुमत विकत घेतले. हे सर्व काय व कसे घडले हे गोवेकरांना समजले आहे.

मुंबई, 29 सप्टेंबर : शिवसेनेने (Shiv Sena) गोव्यातील सरकार (Goa Government)वर जोरदार घणाघात केला आहे. शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात (Saamana editorial) म्हटलं, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम साजरा करत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करत आहेत त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल. गोव्यात निवडणुका आल्या की नवे पक्ष, नव्या आघाड्या निर्माण होतात, स्वत:चे दोन-एक आमदार निवडून आणतात आणि जे सरकार येईल त्यांच्यासोबत सामील होऊन स्वत:चे उखळ पांढरे करुन घेतात. यामध्ये गोव्याचे नुकसानच झाले आहे.

गोव्यातील उद्याच्या निवडणुकांत तरी हे चित्र बदलावे. अल्बुकर्कने गोवा जिंकले आणि 450 वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली ठेवले. गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार आहेत. गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये? असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

...तर भाजपची पाठ थोपटता आली असती

मतदारांना गृहीत धरून नेता परस्पर निर्णय घेतो आणि जनतेची फरफट सुरू होते. गोव्यात गेली काही वर्षे जनतेची अशीच फरफट सुरू आहे. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे तो स्वत:च्या ताकदीवर नाही. मागच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप अल्पमतात होता. काँग्रेसने सर्वाधिक 17 आमदार जिंकनही सत्ता स्थापनेच्या दाव्यास उशीर केला. या काळात भाजपने फोडाफोड करुन बहुमत विकत घेतले. हे सर्व काय व कसे घडले हे गोवेकरांना समजले आहे. गोव्यात 17 आमदारांवरुन काँग्रेस पक्ष चारवर आला. भाजपचा आकडा फुगला हे काही नैतिकतेचे राजकारण नाही. भाजपने स्वबळावर 20-25 जागा जिंकून सत्ता मिळवली असती तर त्यांची पाठ थोपटता आली असती, पण गोव्यात तसे काहीच झाले नाही असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

प्रभाग पद्धतीच्या निर्णयावर ठाकरे सरकार ठाम, बदल नाहीच!

गोव्याला स्वयंपूर्ण कसे बनवणार ते सांगा?

कोरोनामुळे पर्यटनावर संकट कोसळले आणि अर्थकारण बिघडले. लोकांच्या चुली थंडावल्या आहेत. त्याचवेळी अमली पदार्थाने अनेक गावांना समुद्र किनाऱ्यांना विळका घातला आहे. कॅसिनो जुगाराच्या बोटी सरकारला खंडणी देतात. त्या खंडणीवर गोव्यासारखे देवांचे राज्य चालवले जात असेल तर तो हिंदुत्वाचा अपमानच म्हणावा लागेल. कॅसिनो जुगाराविरुद्ध लढा देऊन मनोहर पर्रीकरांनी भाजपला गोव्याला रुजवले. तेच भाजप सरकार आज कॅसिनो मालकांचे गुलाम बनले आहे. आता मुख्यमंत्री सावंत सांगतात, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची अटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा असाही सवाल शिवसेनेने विचारला आहे.

हे ढोंग नाही तर काय?

गोव्यातील लोकांना भाजप हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे. भाजपच्या आमदारांच्या यादीवर नजर टाकली तर आम्ही काय सांगतोय ते कळेल. भाजप ही गोव्यातील खरी 'बीफ' पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्या बंदी कायदा लागू आहे पण गोव्यात हवे तितके बीफ म्हणजे गोमांस मिळत आहे हे ढोंग नाही तर काय? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Goa Election 2021, Shiv sena